AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदल्याच्या आगीतूनच हल्ला? जामिनावरील मंदारवर गोळीबारानंतर कोयत्यानेही सपासप वार; दिसला की तोडा, थरारक प्लॅन समोर

Pune Shivajinagar court firing : वर्षभरापूर्वी झालेल्या शुभम चव्हाण हत्येचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला केल्याचा संशय. आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती समोर येत असून, जामिनावर बाहेर आल्यानंतर मंदारला कसं टार्गेट करण्यात आलं, हल्ल्याचा प्लॅन नेमका काय होता?

बदल्याच्या आगीतूनच हल्ला? जामिनावरील मंदारवर गोळीबारानंतर कोयत्यानेही सपासप वार; दिसला की तोडा, थरारक प्लॅन समोर
Pune Crime NewsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 4:15 PM
Share

रंजीत जाधव, पुणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या जवळ आज चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तीव्र हत्यारांनी वार करत हल्ला केला. न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मंदार मारुती किवळे (३५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार न्यायालयासमोरील रस्त्यावर आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून “मिस फायर” झाल्यामुळे त्याला गोळी लागली नाही मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील असलेल्या कोयत्याने मंदार किवळे वर सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की किवळे याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे झाले होते. हल्ला केल्यानंतर तात्काळ हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गोळीबार प्रकरणात संशयित आरोपी निष्पन्न

गणेश चव्हाण अमोल चव्हाण राहुल चव्हाण अमोल चव्हाण गणेश शुभम चा काका

एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला?

2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात कात्रज भागात शुभम चव्हाण या तरुणाचा खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

टार्गेट ऑन स्पॉट! वेळ ठरली, दिसला की तोडला

शुभम चव्हाण याच्या हल्ल्याला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चव्हाण यांचे सहकारी यांनी या आधीच प्लॅन बनवायला सुरुवात केली होती. शुभमच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव आखला. या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर एक ते देऊन दिवसांपासून आरोपींनी “ट्रॅप” लावला होता. किवळे हा न्यायालीन कामकाजासाठी आज शिवाजीनगर भागातील जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. संबंधित आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तयार करण्यात आली आहेत.

Follow Us
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा