AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Symbol Row : विचारधारा सांगणाऱ्यांची राष्ट्रवादीशी युती होती का? सिब्बल यांच्या युक्तिवादाने फोडला घाम; कोर्टात काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्ह वादावर सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. 'विचारधारा सांगणारे राष्ट्रवादीसोबत युतीत होते का?' असा सवाल करत, शिंदेंच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ संख्याबळावर पक्ष ठरवणे लोकशाहीसाठी गंभीर परिणामकारक ठरू शकते, असेही सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Shivsena Symbol Row : विचारधारा सांगणाऱ्यांची राष्ट्रवादीशी युती होती का? सिब्बल यांच्या युक्तिवादाने फोडला घाम; कोर्टात काय घडलं?
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 4:21 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंसह दादाजी भुसे, गुलाबराव पाटील हे मंत्रीपदावर होते. पण राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी अचानक त्यांना विरोध वाटायला लागला. त्या दिवशीपर्यंत कुणालाच सरकारला विरोध करावा वाटला नाही? कसं शक्य आहे? जे लोकं आज विचारधारा वैगेरे सांगत आहेत, भाजपसोबत निवडणूक पूर्व युती असल्याचं सांगत आहेत, त्यांची राष्ट्रवादीसोबत तशी युती होती का? असा सवालच कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला. कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीवेळी शिंदेंच्या वकिलाच्या सर्व मुद्द्यांवर दुसरी बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात शिवसेना पक्षा आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. 2019मध्ये भाजपला राज्यपालांनी सरकार बनवण्याचं निमंत्रण दिल होतं. पण भाजपने ते निमंत्रण नाकारलं होतं. तेव्हा शिवसेना आणि भाजपची निवडणुकीआधी युती होती. कोणीच सरकार बनवलं नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. एक दिवस अचानक फडणवीस आणि अजितदादांनी पहाटेच सरकार स्थापन केलं. तेव्हा तरी कुठे भाजप आणि अजित पवार यांची निवडणुकी आधी युती होती? त्यामुळे आधी युती होती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो, असं म्हणणं चुकीचं आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

तेव्हा शिंदे मंत्री होते

फडणवीस आणि अजितदादांचं सरकार फार काळ टिकलं नाही. फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेही होते. तेव्हा त्यांना विरोध करावा वाटला नाही, याकडेही सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. –

तर परिणाम गंभीर होतील

विधिमंडळातील बहुमत गेलं म्हणजे पक्ष गेला असं कसं होत? सदस्याचे वर्तन अपात्रता करण्यासारखे होते का? हे महत्त्वाचे आहे. पहिली फूट पडली तेव्हा पक्ष कोण होता हे महत्वाचं आहे. पण तरीही शिंदेंचा गट हा शिवसेना आहे, असा निकाल दिला गेला. जे ठराव झाले ते केवळ आकडे जुळवण्यासाठी झाले. कोण राजकीय पक्ष आहे हे विधिमंडळ पक्ष ठरवू शकत नाही. त्यांनी विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष समजले, असे जर झाले तर याचे परिणाम खूप गंभीर होतील, असंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

Follow Us
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा