Budget 2026 : देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर; मुंबई-पुणेसह इतर कोणते मार्ग?

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात देशभरातील सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-पुणेसह इतर कोणत्या मार्गांचा समावेश असेल, त्याबद्दल जाणून घ्या..

Budget 2026 : देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर; मुंबई-पुणेसह इतर कोणते मार्ग?
निर्मला सीतारमण
Image Credit source: Tv9
| Updated on: Feb 01, 2026 | 12:03 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या 3.0 कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे. त्यांनी या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलच्या महत्तपूर्ण विधानांनी केली. भारत लवकरच सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वे, रस्ते वाहतुकीसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. पायाभूत सुविधा आणखी सक्षम करण्याच्या मार्गात या घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. अर्थसंकल्पातील या महत्त्वपूर्ण घोषणा कोणत्या आहेत, ते जाणून घ्या..

हायस्पीड रेल्वे कॉरडॉर

देशभरात सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्यात येणात आहेत. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी या मार्गांवर नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवण्यात येणार आहेत.

  • मुंबई ते पुणे
  • पुणे ते हैदराबाद
  • हैदराबाद ते चेन्नई
  • हैदराबाद ते बेंगळुरू
  • चेन्नई ते बेंगळुरू
  • दिल्ली ते वाराणसी
  • वाराणसी ते सिलिगुडी

पायाभूत सुविधा

पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या बळकटीवर भर देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांवर 2026-27 मध्ये 12.2 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्यात येणार आहे.

20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग

पुढील 5 वर्षांत 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग बांधण्यात येतील. तर पर्यटन वाढीसाठी सी-प्लेन सुरू करण्यात येणार आहे. वाराणसी आणि पाटणामध्ये जहाजबांधणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

सध्याचे कॉरिडॉर हायस्पीड करणार

देशभरात नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्यात येणार आहेत. अहमदाबाद-मुंबई कॉरिडॉरच्या पलीकडे हायस्पीड कॉरिडॉर बांधण्याची ही योजना आहे. याशिवाय सध्याचे कॉरिडॉर हायस्पीडमध्ये रुपांतरित करण्याची योजना आहे, जेणेकरून वंदे भारत एक्स्प्रेससारख्या गाड्या यादरम्यान चालवता येतील.

अर्थसंकल्पीय भाषणात सरकारचा पायभूत सुविधांचा रोडमॅप सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, प्रस्तावित कॉरिडॉर हे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारतील. हे कॉरिडॉर लांब पल्ल्याच्या प्रवासातील कार्बन फूटप्रिंटदेखील कमी करतील.