AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year End: शेअर बाजार सुसाट मात्र वेदांताचे शेअर वर्षभरात 3 ‘D’ मुळे घसरले

Share Market Vedanta Share | सरत्या वर्षाला निरोप देत असताना शेअर बाजाराने नवीन भरारी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात वेदांता ग्रुपची सहा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी म्हणजे डिमर्जर करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. शेअर धारक या निर्णयामुळे नाराज दिसून येत आहे.

Year End: शेअर बाजार सुसाट मात्र वेदांताचे शेअर वर्षभरात 3 'D' मुळे घसरले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 31, 2023 | 2:35 PM
Share

मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना शेअर बाजारात नवीन विक्रम झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७२ हजारांवर पोहचला आहे. त्याचवेळी निफ्टीनेही २१ हजारांचा टप्पा पार केला आहे. शेअर बाजारातील अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर वर्षभरातील उच्चांकी पातळीवर आहे. परंतु अनिल अग्रवाल यांच्या वेदांत कंपनीचे शेअर घसरले आहे. मेटर आणि मायनिंग सेक्टरमधील या दिग्गज कंपनीचे शेअर वर्षभरात तब्बल २२ टक्के घसरले आहे. वेदांताचे शेअर घसरणीमागे तीन D असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

काय आहे तीन D

वेंदातासंदर्भातील तीन D म्हणजे वेदांताच्या पेरेंट कंपनीवर असलेले कर्ज म्हणजे डेट (Debt), दुसरा D म्हणजे घसरणारा डिव्हिडंट (dividend) आणि तिसरा D म्हणजे डिमर्जर (demerger) आहे. वेदांताच्या शेअरमध्ये घसरणीचे सलग दुसरे वर्ष आहे. त्यापूर्वी २०२१ मध्ये शेअरची किंमत दुप्पट झाली होती. वेदांताची पेरेंट कंपनी वेदांता रिसोर्सेजला सन २०२४-२५ मध्ये दोन अब्ज डॉलरचे बॉन्ड्सचे रिपेमेंट करायचे आहे. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजकडून दिलेल्या माहितीनुसार कंपनीला पुढील आर्थिक वर्षात 3.6 अब्ज डॉलरचे लोन रिपेमेंट करावे लागणार आहे.

कंपनीकडून कमी डिव्हिडंट

कंपनीने या वर्षात एका रुपयाच्या शेअर एक रुपये अंतरिम डिव्हडंट जाहीर केला आहे. मागील तीन वर्षांत कंपनीने दिलेला हा सर्वात कमी डिव्हिडंट आहे. वेदांताची उपकंपनी हिंदुस्तान जिंकने मागील पाच वर्षांत सर्वात कमी डिविडेंट पेआउट दिला आहे. सप्टेंबर महिन्यात वेदांता ग्रुपची सहा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी म्हणजे डिमर्जर करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. शेअर धारक या निर्णयामुळे नाराज दिसून येत आहे. डिमर्जर प्रक्रियेमुळे ऑक्टोंबरमध्ये एक बेस मेटल युनिट सुरु करण्यात आला आहे. दरम्यान वेदांता शेअर संदर्भात 14 विश्लेषकांनी आपले मत दिले आहे. त्यातील 7 जणांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तर 4 विश्लेषकांनी ‘होल्ड’ चा सल्ला दिला आहे. 3 विश्लेषकांनी ‘सेल’ करण्याचे म्हटले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच