BSE-Airtel सह ‘या’ 6 शेअर्सवर ठेवा लक्ष! शेअर बाजारात जोरदार तेजीची अपेक्षा

Stock Market Outlook Today: गुरुवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार 'गॅप-अप' सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमेरिकन बाजारपेठांमधील मोठी तेजी आणि 'गिफ्ट निफ्टी'मधील वाढीमुळे हा परिणाम दिसेल.

BSE-Airtel सह या 6 शेअर्सवर ठेवा लक्ष! शेअर बाजारात जोरदार तेजीची अपेक्षा
Stock Market Outlook Today
| Updated on: Nov 05, 2026 | 10:38 AM

भारतीय शेअर बाजाराची गुरुवारी दमदार सुरुवात होण्याची शक्यता आहे. याच कारण अमेरिकन बाजारांमधील मोठी तेजी आणि ‘गिफ्ट निफ्टी’ (GIFT Nifty) मधील ३५५ अंकांची वाढ ही आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे. ‘गिफ्ट निफ्टी’ २४,३०५ च्या पातळीजवळ व्यवहार करत होती, जी त्याच्या मागील बंद भावाच्या तुलनेत १.४८% जास्त आहे. यावरून दिसून येतं की, आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी ‘गॅप-अप’ सुरुवात पाहायला मिळू शकते.

अमेरिकन बाजारपेठांमध्ये काय स्थिती?

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यानंतर वॉल स्ट्रीटवर तेजी दिसून आली. डाऊ जोन्समध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ होऊन तो ५३,००० च्या वर बंद झाला आहे. याचाच अर्थ त्यात १,५०० अंशांहून अधिकची भर पडली. दरम्यान, नॅस्डॅक मध्ये १.६ टक्क्यांची, तर एस अँड पी ५०० मध्ये १.५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली.

Loading...

आशियाई बाजारपेठांमधील स्थिती संमिश्र

याच्या उलट, आशियाई बाजारपेठांमधील स्थिती संमिश्र दिसून येत होती. दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारांदरम्यान ४ टक्क्यांहून अधिक घसरला. एवढंच नाही तर या विक्रीमुळे तिथे ‘सर्किट ब्रेकर’ही लागू करावा लागला. जपानचा ‘निक्केई’ आणि तैवानची बाजारपेठही दबावाखाली होती.

आज कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायचं?

१) बीएसई (BSE): सप्टेंबर तिमाहीसाठी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर सुमारे ४५% नी वाढून ८०९.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी हा नफा ५५८.४३ कोटी रुपये होता.

२) भारती एअरटेल: भारती एअरटेल कंपनीच्या शेअर्समध्ये आज काही हालचाल दिसून येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याकडे लक्ष ठेवणं महत्त्वाच ठरेल.

३) महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra): या कंपनीचे शेअर्स चर्चेत राहतील. या कंपनीच्या वाहन विक्रीची आकडेवारी, SUV ची मागणी आणि नफाक्षमता या गोष्टींवर बाजाराचे लक्ष असेल.

४) ओएनजीसी (ONGC): सरकारी मालकीच्या या तेल आणि वायू कंपनीच्या शेअर्समध्येही हालचाल दिसून येऊ शकते. उत्पादनाची आकडेवारी आणि कामकाजाशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचं.

५) नायका (Nykaa): कंपनीचा सप्टेंबर तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक आधारावर सुमारे १९७ टक्क्यांनी वाढून १०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या दमदार निकालांनंतर कंपनीचा शेअर चर्चेत असेल.

६) पीआय इंडस्ट्रीज (PI Industries): या ॲग्रोकेमिकल कंपनीचे शेअर्सही आज महत्त्वाचे ठरतील. या शेअरमध्ये काही हालचाल दिसून येऊ शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती शेअर बाजाराशी संबंधित आहे. हा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us