Loan EMI Trap : कर्जाचा विळखा घेऊ शकतो तुमचा जीव, EMI चा ट्रॅप कसा ओळखायचा? कसं बाहेर यायचं?

अनेकांना आपण कर्जाच्या विळख्यात अडकलेलो आहोत, हेच समजत नाही. त्यामुळेच कर्ज डोईजड होऊ नये यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Loan EMI Trap : कर्जाचा विळखा घेऊ शकतो तुमचा जीव, EMI चा ट्रॅप कसा ओळखायचा? कसं बाहेर यायचं?
loan trap
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 27, 2025 | 7:09 PM

Loan Trap : आजकाल बहुसंख्य लोक कर्ज घेऊनच वस्तू खरेदी करतात. बँका वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज सहज देतात. त्यामुळेच आजघडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. काही लोकांचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार तर EMI मध्येच जातो. कोणताही पूर्वविचार न करता घेतलेले कर्ज नंतर डोईजड होते आणि लोक कर्जाच्या विळख्यात सापडतात. दरम्यान, कर्जाच्या विळख्यात अडकण्याआधी काही संकेत मिळतात. या संकेतांकडे पाहून वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यापुढे भविष्यात मोठे आर्थिक संकट उभे राहू शकतो. हे संकेत नेमके कोणते आहेत? कर्जाच्या विळख्यात अडकून न पडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? ते जाणून घेऊ या…..

जुने कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज घेणे

एकदा व्यक्ती कर्जात अडकली की ती लवकर बाहेर निघत नाही. तुम्ही एखादे कर्ज घेतलेले असेल आणि त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दुसरे एक कर्ज काढावे लागत असेल तर वेळीच सावध व्हा. लवकरच तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. तुमच्यावर असलेले कर्ज लवकरात लवकर चुकते करून तुम्ही सेव्हिंग तसेच भविष्य सुरक्षित करण्यासंदर्भात विचार केला पाहिजे. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढावे लागत असेल तर ते चुकीचे आहे.

उत्पन्नाचा बराच भाग ईएमआयमध्ये जात असेल तर….

नोकरदार किंवा व्यावसायिकांच्या महिन्यातील एकूण मिळकतीपैकी बराच भाग हा ईएमआय देण्यात जात असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण अर्धा पगार, अर्धे उत्पन्न EMI मध्ये जात असेल तर तुमचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच तुम्ही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मिनिमम पेमेंटवर अवलंबून असणे

जवळ पैसे नसतील तर अनेकजण क्रेडिट कार्डमधून पैसे खर्च करतात. परंतु याच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वापरलेले पैसे परत करताना तुम्हाला मिनिमम पेमेंटवर अवलंबून राहावे लागत असेल तर वेळीच सावध व्हा. तुमच्याकडे पैशांची चणचण आहे, हा संकेत यातून मिळतो. त्यामुळेच कर्जाच्या विळख्यात अडकण्याआधी योग्य नियोजन करा.