टॅक्स नसेल तर 1 लिटर पेट्रोलची किंमत किती असेल? वाचा सविस्तर

पेट्रोल आणि डिझेलवर टॅक्स लावला नाही तर त्यांची किंमत किती असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

टॅक्स नसेल तर 1 लिटर पेट्रोलची किंमत किती असेल? वाचा सविस्तर
Petrol
| Updated on: Jul 20, 2025 | 7:56 PM

भारतात गेल्या काही काळापासून इंधनाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशातील जवळपास 70 ते 75 टक्के लोकांवर इंधनाच्या किमतीचा थेट परिणाम होते. पण जर पेट्रोल आणि डिझेलवर टॅक्स लावला नाही तर त्यांची किंमत किती असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे

समोर आलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलवर सरकारकडून बरेच कर लावले जातात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर हे वेगवेगळे असतात. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क लावले जाते, तर राज्य सरकारकडून व्हॅट लावला जातो. तसेच कच्चे तेल आयात होते तेव्हा त्याच्यावर कर लावला जातो. तसेच वाहतूक आणि डीलरलाही कमिशन द्यावे लागते. त्यामुळे पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.

इंधनावर कोणते टॅक्स लावले जातात?

पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावले जातात. सर्व प्रथम उत्पादन शुल्क आणि व्हॅट लावला जातो, जो केंद्र आणि राज्य सरकारकडून लावला जातो. त्यानंतर इंधनाच्या किमतींमध्ये डीलर कमिशन आणि वाहतूक आणि इतर शुल्क जोडले जाते. यामुळे पेट्रोलची किंमत आणखी वाढते.

प्रत्येक राज्यात वेगवेगळा दर

महत्वाची बाब म्हणजे देशातील विविध राज्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात व्हॅट आकारला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये इंधनाच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

पेट्रोलची मुळ किंमत किती?

तेल कंपन्यांसाठी पेट्रोलची किंमत 55.66 रुपये आहे, मात्र सर्व कर आणि शुल्क जोडल्यानंतर ती 100 रुपयांच्या पुढे जाते. हे कर नसते तर पेट्रोलची किंमत 55.66 रुपये प्रति लिटर असती. महत्वाची बाब म्हणजे 55.66 रुपयांमध्येही काही शुल्क आकारले जाते. कारण कच्च्या तेलाची किंमत 40 रुपये लिटर आहे. यावर प्रक्रिया करण्यासाठी 5.66 रुपये लागतात, तसेच इतर खर्च 10 रुपये लागतो, त्यामुळे ही किंमत 55.66 रुपयांपर्यंत पोहोचते.