AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेट

सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेट
Rupali Chakankar Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 20, 2026 | 10:10 PM
Share

सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवलं आहे. अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.

CM फडणवीस यांच्या आदेशानंतर राजीनामा

काही वेळापूर्वी रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

रुपाली चाकणकर यांनी पत्रात काय म्हटलं?

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल. तसेच अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी