Sum Assured : सम ॲश्युर्डचा अर्थ तरी काय? विमा खरेदीपूर्वी घ्या जाणून

| Updated on: Feb 05, 2023 | 9:13 PM

Sum Assured : Sum Assured ही शब्द आपण विमा पॉलिसी खरेदी करताना सतत ऐकतो. पण सम अॅश्युर्डचा अर्थ काय असतो, त्याचा फायदा काय होतो?

Sum Assured : सम ॲश्युर्डचा अर्थ तरी काय? विमा खरेदीपूर्वी घ्या जाणून
Follow us on

नवी दिल्ली : भारतात विमा (Insurance) खरेदीकडे अनेकांचा ओढा असतो. जीवन विमा खरेदी करण्यात भारतीय आघाडीवर आहेत. आता आरोग्य विमा खरेदीकडे भारतीयांचा ओढा वाढला आहे. विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही दोन शब्द हमखास ऐकले असतील. ‘सम ॲश्योर्ड’ (Sum Assured) आणि ‘सम इंश्योर्ड’(Sum Insured) हे दोन शब्द तुम्ही ऐकले असतील. पण या शब्दांचा काय अर्थ असतो, त्याचा परिणाम काय, या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. शक्यतोवर सम ॲश्युर्डसाठी विमा पॉलिसी खरेदी करण्यात येते. सम ॲश्युर्डचा अर्थ विमा रक्कम असा असतो. विमा संरक्षण देताना विमा कंपनी एक मूल्य जाहीर करते. विमा योजना खरेदी करणाऱ्या विमाधारकाला हे मूल्य जाहीर करण्यात येते.

सम ॲश्युर्ड हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्या दरम्यानचा निश्चित लाभ आहे. ही रक्कम विमा पॉलिसी खरेदी करताना देण्यात येते. जीवन विमा योजना विमाधारकाला, पॉलिसी टर्मदरम्यान हमी देते. यादरम्यान विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास वारसाला पूर्व निर्धारीत रक्कम देण्यात येते. ही रक्कमच सम ॲश्युर्ड असते.

काही योजनांवर बोनसही देण्यात येतो. मॅच्युरिटी संपल्यानंतर विमा योजनेनुसार विमा धारकाला बोनस मिळतो. पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर बोनससोबतच विमाधारकाला सम ॲश्युर्ड रक्कम मिळते. ही रक्कम कंपन्या विमाधारकाला देतात.

हे सुद्धा वाचा

सम ॲश्युर्डला संरक्षण अथवा संरक्षण रक्कम म्हणून ही ओळखल्या जाते. जीवन विमा योजना खरेदी करताना सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सम ॲश्युर्डची निवड ही आहे. सम ॲश्युर्डची योग्य निवड महत्वाची आहे. त्याआधारे तुम्हाला आणि वारसाला योग्य रक्कम मिळते.

सम ॲश्युर्डची गणना करताना वेगवेगळे नियम, अटी आणि शर्ती यांचा विचार करण्यात येतो. विमाधारकावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च, रिटायरमेंट फंड या आधारावर सम ॲश्युर्डची निवड करावी.

या वर्षाच्या सुरुवातीला विमा पॉलिसीशी (Insurance Policy) निगडीत एक महत्वपूर्ण नियम लागू झाला आहे. या नियमानुसार, लोकांना आता नवीन विमा पॉलिसी घेताना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) हा नियम लागू केला आहे.

हा नियम जीवन विमा, आरोग्य, ऑटो, घर आणि इतर सर्व प्रकारच्या विम्यासाठी लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे आता विमाधारकाला अनेक फायदे मिळणार आहेत. तसेच कंपनीवरील ताणही कमी होणार आहे.