SHARE MARKET TRACKER: तेजी की घसरण, शेअर बाजाराची नेमकी दिशा काय; वाचा-तज्ज्ञांचे मत

| Updated on: May 22, 2022 | 9:56 PM

चालू महिन्यात आतापर्यंत 35 हजार कोटींहून अधिक शेअर विक्रीचा ओघ राहिला आहे. आगामी आठवड्यात शेअर बाजाराचं नेमकं चित्र कसं राहिलं याकडे गुंतवणुकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

SHARE MARKET TRACKER: तेजी की घसरण, शेअर बाजाराची नेमकी दिशा काय; वाचा-तज्ज्ञांचे मत
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात (INDIAN SHARE MARKET) परकीय गुंतवणुकदारांचे विक्रीचे सत्र सुरू आहे. देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या खरेदी धोरणामुळं शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात (EXCISE RATE DEDUCTION) करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये अनुक्रमे 8 व 6 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य खरेदीदारांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. परकीय गुंतवणुकदारांचा अद्यापही शेअर विक्रीकडं कल कायम आहे. चालू महिन्यात आतापर्यंत 35 हजार कोटींहून अधिक शेअर विक्रीचा ओघ राहिला आहे. आगामी आठवड्यात शेअर बाजाराचं नेमकं चित्र कसं राहिलं याकडे गुंतवणुकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

‘या’ घटकांकडे लक्ष:

वाढत्या महागाई दराचा आलेख (INFLATION RATE GRAPH), डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आर्थिक तिमाही अहवालांच (Q4 REPORT) स्वरुप यावर शेअर बाजाराचा कल अवलंबून असणार आहे.

आंतरराष्ट्रीय पटलावरील घडामोडी:

आगामी आठवड्यात शेअर बाजाराची दिशा आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून असेल. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च हेड संतोष मीना यांनी देशांतर्गत शेअर बाजारात तेजी-घसरणीचं चित्र राहिलं आहे. निफ्टीमध्ये पाच सत्रांत सलग घसरणीनंतर साप्ताहिक तीन टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

महागाईचा इफेक्ट:

जागतिक महागाईचा चढत्या आलेखाचं भारतीय शेअर बाजारावर सावट आहे. अमेरिकेत महागाईचा दर उंचावला आहे. यामुळे गुंतवणुकदारांनी नो रिस्कचं धोरण हाती घेतलं आहे. परकीय गुंतवणुकदारांनी शेअर विक्रीचा ओघ कायम ठेवला आहे.

आकडे बेरोजगारीचे:

सॅमको सिक्युरिटीजचे इक्विटी हेड येशा शाह यांनी अमेरिकेच्या जीडीपी अंदाज व बेरोजगारीच्या आकड्यांवर जागतिक शेअर बाजाराच्या व्यवहाराची दिशा ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

प्रतीक्षा तिमाही अहवालाची:

आगामी आठवड्यात सेल, झोमॅटो, अदानी पोर्टस्, दीपक फर्टिलायझर्स, इंटरग्लोब एव्हिएशन, हिंदाल्को, एनएमडीसी, गेल आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे आर्थिक पाहणी अहवाल समोर येणार आहेत. रेलिगेयर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी जागतिक अर्थपटलावरील घडामोडी, आर्थिक तिमाही पाहणी अहवाली, रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती शेअर बाजाराची दिशा निश्चित करेल.