
Income Tax Return Filling 2025: आयकर विभागाने आर्थिक वर्ष सन २०२४-२५ साठी इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी केले आहेत. यंदा अर्थसंकल्प २०२४ मध्ये जाहीर केलेल्या बदलांचा समावेश आयकर रिटर्न फॉर्ममध्ये करण्यात आले आहे. तुम्ही पगारदार असाल तर आयटीआर १ आणि आयटीआर २ मध्ये कोणता फॉर्म भरावा, यासंदर्भात तुम्हाला माहिती हवी. पगारदार व्यक्तींसाठी हे दोन फॉर्म असतात.
आयकर विभागाने जे करदाते आयटीआर-१ चा वापर करतात त्यांच्यासाठी नियमात बदल केला आहे. या बदलामुळे अनेक करदात्यांना आपले आयटीआर फाईल करणे सोपे होणार आहे. यापूर्वी ज्या करदात्यांना कॅपिटल गेन मिळत होता, ते आयटीआर १ फॉर्मचा वापर करु शकत नव्हते. नवीन फॉर्मनुसार व्यक्तीगत करदाते आयटीआर १ चा वापर करुन आपले इनकम टॅक्स रिटर्न दाखल करु शकणार आहेत. फक्त त्यासाठी काही अटी आहेत. त्यांना झालेला फायदा हा लिस्टेड इक्विटी शेअर किंवा इक्विटी म्यूचुअल फंड यूनिट्समधून झालेला हवा. तसेच हा लाभ संपूर्ण आर्थिक वर्षात १.२५ लाखांपेक्षा जास्त असू नये.
कोणताही पगारदार व्यक्ती आयटीआर १ भरण्यासाठी पात्र आहे. त्याने खालील दिलेल्या अटीपैंकी कोणतीही एक अट पूर्ण करायला हवी.
जे करदाते आयटीआर १ वापरु शकत नाही आणि खालील अटींपैकी कमीत कमी एक अट पूर्ण करत असतील त्यांच्यासाठी आयटीआर २ फॉर्म आहे.