आयुर्वेदाने घडवली यशस्वी बिझनेसवुमन, ती पण 9 ते 5 नोकरी करायची, कोण आहे रिमझिम सैकिया ?

HSBC आणि Vodafone सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी केली. ठरलेला पगार आणि स्थिर नोकरी असूनही त्यांना आतून संतुष्टी मिळत नव्हती. त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल.

आजच्या काळात जेव्हा लोक सुरक्षित नोकरीला यशस्वी होणं मानतात. तेव्हा काही लोक ह्दयाचा आवाज ऐकतात. रिमझिम सैकिया अशाच एक बिझनेसवुमन आहेत. त्यांनी कॉर्पोरेट विश्वाचा आरामदायक नोकरीचा मार्ग सोडून आयुर्वेद आणि वेलनेसच्या रस्त्याची निवड केली. त्यांच्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण त्यांनी स्वत:वर विश्वास दाखवला. आज त्या Tatvik Ayurveda and Wellness Pvt Ltd च्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची गोष्ट साहस, मेहनत आणि आत्मनिर्भरतेच उत्तम उदहारण आहे.

रिमझिम सैकिया यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका प्रोफेशनल कॉर्पोरेट वातावरणात केली. त्यांनी IIT Delhi मधून डिजिटल मार्केटिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर HSBC आणि Vodafone सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी केली. ठरलेला पगार आणि स्थिर नोकरी असूनही त्यांना आतून संतुष्टी मिळत नव्हती. त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल.

आयुर्वेदाकडे कल वाढला

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना रिमझिम यांचा कल आयुर्वेद आणि वेलनेसकडे वाढू लागला. ही केवळ आवड नव्हती. हळू-हळू हा एक उद्देश बनत गेला. पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञान आधुनिक गरजांनुसार सादर केलं पाहिजे रिमझिम यांना जाणवलं. याचं विचाराने त्याने मोठ पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांना सुरक्षित नोकरी सोडून साहसी निर्णय घेतला.

Tatvik Ayurveda चा पाया

9 ते 5 नोकरी सोडून रिमझिम यांनी Tatvik Ayurveda and Wellness Pvt Ltd ची स्थापना केली. पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचा संगम यावर ब्रँडचा पाया रचला गेला. सुरुवातीला अनेक आव्हान आली. पण त्यांनी धैर्य आणि शिस्त सोडली नाही. हळूहळू Tatvik ने आपली ओळख बनवायला सुरुवात केली. आज हा ब्रांड क्वालिटी ते आयुर्वेदिक स्किनकेयर प्रोडक्टसाठी ओळखला जातो.

महिला सशक्तिकरणाचं उदहारण

Tatvik Ayurveda केवळ एक बिझनेसच नाही, तर महिला सशक्तिकरणाचं सुद्धा उदाहरण आहे. रिमझिमच्या कंपनीत जवळपास 80 टक्के महिला काम करतात. त्याने महिलांना रोजगार आणि आत्मनिर्भरतेची संधी मिळाली. महिला पुढे जातात, तेव्हा संपूर्ण समाज मजबूत होतो असं रिमझिम सैकिया यांचं मत आहे. हीच त्यांची विचारसरणी कंपनीच्या वर्क कल्चरमध्ये सुद्धा दिसून येते.

राष्ट्रीय स्तरावर ओळख

रिमझिम सैकिया यांच्या कामाचं राष्ट्रीय स्तरावर सुद्धा कौतुक झालय. 2023 मध्ये त्यांना केंद्रीय MSME मंत्र्यांनी टॉप 12 उदयोन्मुख महिला उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश केला. हा सन्मान त्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे.

यशासाठी मजबूत इरादे आवश्यक

रिमझिम सैकिया यांची गोष्ट हेच शिकवते की,फायनान्शियल फ्रीडम केवळ कमाईने मिळत नाही. आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवणं आणि मेहनतीने निभावणं याने यश मिळतं. इरादे मजबूत असतील तर सुरक्षित मार्ग सोडूनही तुम्ही यश मिळवू शकता. त्यांची स्टोरी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा आहे.