सण धूमधडाक्यात साजरे होणार, महागाईच्या मोर्चावर आनंदवार्ता, सर्वसामान्यांना तो मोठा दिलासा
Wholesale Inflation Rate Down: भारतात घाऊक महागाई दराबाबत मोठा अपडेट समोर आली आहे. जून महिन्यात हा दर 9.87 टक्के होता. तो घसरून जुलै महिन्यात 9.78 टक्क्यांवर आला आहे. जुलै महिन्यात इंधन आणि वीज दरांमध्ये घसरण होऊन तो 20.05 टक्क्यांवर आला आहे. पण काही महत्त्वाच्या वस्तूंची किंमत वाढून 8.52 टक्के इतकी झाली आहे.

किरकोळ महागाईने सर्वसामान्य नागरीक अजूनही होरपळलेले आहे. पण ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तोरा उतरण्याची दाट शक्यता आहे. घाऊक महागाई दर कमी झाला आहे. त्यात अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्यात घाऊक महागाई दर 9.87 टक्के होता. हा दर जुलै महिन्यात 9.78 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याच महिन्यात इंधन आणि वीज दरांमध्ये 20.05 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. काही महत्त्वाच्या वस्तूंची किंमत 8.52 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यापूर्वी 2022-23 नंतर या जूनमधील महागाई दर सर्वाधिक होता. या नवीन आकडेवारीने सर्वसामान्यांना लवकरच गुडन्यूज मिळण्याची चिन्हं आहेत.
सरकारी आकडेवारीनंतर जुलै मधील महागाई दर समोर आला. देशात किरकोळ महागाई दर जून महिन्यात 4.38 टक्के इतका होता. तो वाढून 4.45 टक्क्यांवर पोहचला. खाद्यपदार्थ आणि अन्नधान्याची महागाई, विशेषता साखरेचा वाढलेला भाव हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सरकारला त्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईची सूज कमी होईल. रॉयटर्सने वृत्त संस्थेने घाऊक महागाई दर जुलै महिन्यात 9.95 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण हा धोका टळला.
विद्युत आणि इंधन बास्केटमध्ये स्वस्ताई
जुलै महिन्यात इंधन आणि विद्युत बिलाच्या बास्केटचा महागाई दर 20.05 टक्के इतका आहे. यापूर्वी जून महिन्यात हा दर 27.41 टक्के इतका होता. महागाई दर मे महिन्यात 30.33 टक्के होता. जुलै महिन्यात प्राथमिक खाद्य पदार्थांचा महागाई दर 8.52 टक्के होता. जून महिन्यात तो 7 टक्के इतका होता. WPI म्हणजे घाईक महागाई दरात प्राथमिक खाद्य पदार्थ, उत्पादित खाद्य पदार्थांचाही समावेश असतो. त्याआधारे हा दर ठरतो. खाद्यपदार्थांचा महागाई दर हा जून महिन्यात झपाट्याने वाढला. यापूर्वी मे महिन्यात हा दर 4.49 टक्के, जुलै महिन्यात 6.65 टक्के तर जून महिन्यात हा दर 6.14 टक्के इतका होता.
महागाईला उकळी का?
खाद्यपदार्थांची, अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. साखरेने तर 55 रुपये किलोचा दर गाठला आहे. इंधनासह अनेक घटकांचा घाऊक महागाईवर मोठा परिणाम झाला. इतर वस्तूच्या किंमतीत क्रमशः 13.28 टक्के आणि 17.66 टक्के नोंदवला गेला. तर उत्पादित मालक, खाद्य उत्पादनं, इतर पदार्थांनी घाऊक महागाईत आग ओतली. महागाई दर क्रमशः 8.89 टक्के, 12.56 टक्के आणि 13.12 टक्के असा वाढत गेला. आता घाईक महागाई दर उतरल्याने किरकोळ महागाई दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.