AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

| Updated on: Sep 29, 2026 | 12:14 PM
Share

पुण्यातील सगुणा चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, मजल्यातून धूर बाहेर पडताना दिसत आहे.

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील सगुणा चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. बँकेच्या चौथ्या मजल्याला आग लागल्याने, त्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे चित्र आहे. सध्या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी, अग्निशमन दलाचे जवान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच गर्दी झाली होती. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे, पण आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.

Published on: Sep 29, 2026 12:14 PM

Follow Us