500 रुपयांची नोट बंद होणार? NDA आघाडीतील या बड्या नेत्याने का केली मागणी?

500 Hundred Rupees Notes: 500 रुपयांची नोट छापण्यासाठी खर्च किती येतो, याची आता देशभरात चर्चा सुरू झाली आहे. सरकार मोठ्या मूल्याच्या नोटांची छपाई बंद करणार का, असा सवाल विचारल्या जात आहे, कारण NDA आघाडीतील या बड्या नेत्याने याविषयीची मोठी मागणी केली आहे.

500 रुपयांची नोट बंद होणार? NDA आघाडीतील या बड्या नेत्याने का केली मागणी?
500 रुपयांची नोट बंद होणार? NDA आघाडीतील या बड्या नेत्याने का केली मागणी?
| Updated on: Nov 10, 2026 | 2:02 PM

500 Hundred Rupees Notes: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी 500, 1,000 आणि 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत आता केवळ 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच चलनात ठेवण्याची मागणी रेटली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वी झालेल्या नोटबंदीची आठवण त्यांना करून दिली आहे. त्यावेळी काळापैसा रोखण्यासाठीच नोटबंदी करण्यात आली होती ना? असा खोचक सवाल ही त्यांना विचारण्यात आला आहे.

चंद्रबाबू नायडू काय म्हणाले?

Loading...

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे माध्यमांशी बोलताना जास्त मूल्याच्या नोटांचा मर्यादित वापर करण्याची वकिली केली. त्यांनी अवैध कामासाठी आणि निवडणुकीत नोटांच्या गैरवापराचा मुद्दा उचलला. त्यांनी मनी पॉवर रोखण्याची मागणी केली. जर रोखीत व्यवहारासाठी केवळ 100 आणि 200 रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या तर मोठ्या प्रमाणात नोटा लागतील आणि त्यांचा साठा करणे अवघड होईल.

डिजिटल चलनाची सूचना माझीच – नायडू

डिजिटल चलनाविषयीची सूचना माझीच होती. मीच सर्वाच अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविर विचार करण्याचा आग्रह धरला होता. अजून ही मागणी करतो. मी हा मुद्दा कायम प्रकाशझोतात आणत राहील . 500, 1,000 आणि 2,000 रूपयांच्या नोटा बंद करण्यात याव्यात. केवळ 100 आणि 200 रूपयांच्या नोटा चलनात असाव्यात, असे नायडू म्हणाले. आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य ऐतिहासिक 8 नोव्हेंबर 2016 रोजीच्या नोटबंदीच्या १० व्या वर्धापन दिनाच्या दिनापूर्वी आले आहे. अर्थात चंद्रबाबू नायडू यांनी ही मागणी केली असली तरी सरकारने 500, 1,000 आणि 2,000 रूपयांच्या नोटा बंद करण्याविषयी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

500 रुपयांची नोट छापण्याचा खर्च किती?

केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या RBI च्या एका अहवालानुसार, 500 रुपयांची एक नोट छापण्यासाठी जवळपास 2.29 ते 2.65 रुपयांचा खर्च येतो. 10 आणि 20 रुपयांच्या नोट छापण्यासाठी 95 पैसे ते 1.01 रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत या नोटांसाठी अधिक छपाई खर्च येतो. 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा खर्च जास्त आहे कारण की, आधुनिक सुरक्षा फीचर्स त्यात आहेत. 100 रुपयांच्या नोट 1.77 रुपये तर 200 रुपयांची नोट जवळपास 2.37 ते 2.93 रुपयांमध्ये तयार होतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us