Air India Pilot : तयार ठेवा बायोडाटा! जगातील सर्वात मोठ्या डीलनंतर Air India चे अजून एक धमाकेदार पाऊल

| Updated on: Feb 17, 2023 | 9:14 PM

Air India Pilot : तुमचा बायोडाटा अपडेट ठेवा. लवकरच तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. विमान खरेदीचा जगातील मोठा करार केल्यानंतर एअर इंडिया लवकरच पुढील पाऊल टाकणार आहे.

Air India Pilot : तयार ठेवा बायोडाटा! जगातील सर्वात मोठ्या डीलनंतर Air India चे अजून एक धमाकेदार पाऊल
Follow us on

नवी दिल्ली : एव्हिएशन जगात 470 विमान खरेदी करण्याचा जगातील मोठा करार केल्यानंतर एअर इंडिया (Air India) आता आणखी मोठी घोषणा करणार आहे. या करारानुसार, लवकरच विमान कंपनीच्या ताफ्यात दिसतील. या मोठ्या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट (Pilot) आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, येत्या काही वर्षांत एअरबस (Airbus) आणि बोईंगकडून विमान खरेदी करण्यात येणार आहे. 470 विमानांच्या खरेदीनंतर त्यांना चालविण्यासाठी 6,500 हून अधिक पायलटची गरज पडेल. या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. याच प्रक्रियेचा भाग म्हणून 840 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरनुसार आता येत्या दशकात एअरबस आणि बोइंगकडून 470 विमान खरेदी करण्यात येतील. तसेच यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे.

टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले. त्यानंतर एअर इंडियाच्या विस्ताराची मोठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 840 विमानांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे. आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. सध्या एअर इंडियाकडे 113 विमान आहेत. सध्या कंपनीकडे 1,600 पायलट आहेत.

हे सुद्धा वाचा

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया असे मिळून एकूण 220 विमानांचा ताफा आहे. या विमानांच्या संचालनासाठी सध्या 3,000 हून अधिक पायलट आहेत. काही दिवसांपूर्वी कर्मचारी आणि पायलट नसल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडियाकडे सध्या 54 विमान उडविण्यासाठी 850 पायलट आहेत. तर विस्तारा समूहाकडे 53 विमाने असून 600 अधिक पायलट आहेत.

एअर इंडियाने 470 विमानांसाठी ठेका दिला आहे. ज्यामध्ये एअरबसकडून 250 विमान आणि बोईंग कंपनीकडून 220 विमान खरेदी करण्यात येणार आहे. सीएफएम इंटरनॅशनल, रॉल्स-रॉयस आणि जीई एअरोस्पेस सोबत इंजिनाच्या देखभालीसाठी डील केली आहे.

या ऑर्डरमध्ये 210, ए320/321 नियो/एक्सएलआर विमान तर 40, ए350-900/1000 विमानांचा समावेश आहे. बोईंग कंपनीला दिलेल्या ऑर्डरमध्ये 190, 737-मॅक्स विमान, 20, 787 विमान आणि 10, बोइंग 777 विमानांचा समावेश आहे. ए350 हे कॉर्गो विमान एअर इंडिया खरेदी करणार आहे.

एअर इंडियाला प्रति विमान 30 पायलट लागतील. ए350 या विमानासाठी 1,200 पायलटची गरज आहे. बोइंग 777 साठी 26 पायलट लागतील. अशा 10 विमानांचा समावेश केल्यास 260 पायलट लागतील. 20 बोइंग 787 विमानांसाठी 400 पायलटची गरज आहे. अजून इतर विमानांचा विचार करता कमीत कमी 4,800 पायलटची गरज भासेल.