Govt Jobs : पैसा डबल वगैरे होत नसतो, नोकरीच करावी लागते ! महाराष्ट्र क्रीडा विभागात नोकरी, त्वरा करा…

| Updated on: May 04, 2022 | 4:39 PM

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये त्यामुळे पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणारे.

Govt Jobs : पैसा डबल वगैरे होत नसतो, नोकरीच करावी लागते ! महाराष्ट्र क्रीडा विभागात नोकरी, त्वरा करा...
क्रीडा व युवा सेवा संचालनालयात भरती प्रक्रिया
Image Credit source: क्रीडा व युवा सेवा संचालनालय
Follow us on

पुणे : क्रीडा व युवा सेवा संचालनालयात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 16 रिक्त पदांसाठीच्या जागा (Vacant Post) आहेत. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अर्ज (Application) करायची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. पात्र उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखत घेऊन केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये त्यामुळे पदांनुसार शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) असणारे. वयाची अट, पगार आणि इतर माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे.

पदाचे नाव

  1. सहाय्यक प्रशिक्षण (Assitant Coach)
  2. सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assitant Coach Cum Technician- Shoot)
  3. स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर (Sports Medicine Doctor)
  4. पोषणतज्ञ (Nutritionist)
  5. हे सुद्धा वाचा
  6. फिजिओथेरपिस्ट ग्रेड II / ग्रेड I (Physiotherapist Grade II/ Physiotherapist Grade I )
  7. यंग प्रोफेशनल्स (Young Profesional)
  8. मासूर (Masseur)
  9. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)
  10. ग्राउंड मॅन (Groundman)

अर्ज पाठवायचा पत्ता

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045

इतर माहिती

रिक्त पदे – 16 पदे

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज करायची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 24 मे 2022

निवड करायची पद्धत – परीक्षा किंवा मुलाखत

महत्त्वाचे

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.