मुलाखतीमधून होणार निवड, परीक्षेचे नो टेन्शन, इतक्या पदांसाठी भरती सुरू

ICAR NBSSLUP recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता अजिबातच नो टेन्शन. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

मुलाखतीमधून होणार निवड, परीक्षेचे नो टेन्शन, इतक्या पदांसाठी भरती सुरू
job
| Updated on: Apr 15, 2024 | 12:32 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष थेट या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये. थेट पद्धतीने म्हणजे मुलाखतीमधून उमदेवाराची निवड ही केली जाणार आहे. चला तर मग इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी झटपट अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया भारतीय कृषी संशोधन परिषद, नागपूर यांच्याकडून राबवली जातंय. यंग प्रोफेशनल या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय कृषी संशोधन परिषद, नागपूरमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

आयटी विभागातील यंग प्रोफेशनल पदासाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर असावा  किंवा विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानामधील उमेदवाराकडे पदवी असावी.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला https://nbsslup.icar.gov.in/ या साईटवर आरामात मिळेल. https://nbsslup.icar.gov.in/wp-content/uploads/2024/Recruitment/Recruit_AKMU_03042024.pdf येथे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही आपल्याला वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

उमेदवाराची निवड ही मुलाखतीमधून केली जाईल. ICAR राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर येथे मुलाखतीसाठी उमेदवारांना पोहचावे लागेल. मुलाखतीला येताना उमदेवारांनी कागदपत्रेही सोबत ठेवावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.