Raliway Jobs : आता थेट व्हा सरकारी नोकर, रेल्वेत खास भरती निघाली, दहावी पास असले तरी…

Raliway Jobs : रेल्वेने स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत 67 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड फक्त खेळातील उपलब्धी आणि चाचण्यांच्या आधारावर होईल. तुम्हाला जर या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...

| Updated on: Sep 16, 2025 | 4:01 PM
1 / 8
रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) दक्षिण रेल्वेने खेळात प्राविण्य असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत एकूण 67 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जर तुम्ही खेळात उत्तम कामगिरी केली असेल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खास ठरू शकते.

2 / 8
इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल आणि यासाठी उमेदवारांना दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcmas.in वर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

3 / 8
या भरतीअंतर्गत एकूण 67 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर विभागले गेले आहे. यामध्ये लेवल 4 आणि 5 साठी 5 पदे, लेवल 2 आणि 3 साठी 16 पदे आणि लेवल 1 साठी 46 पदांचा सामावेश आहेत.

4 / 8
पात्रतेच्या बाबतीत, लेवल 1 च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 10वी उत्तीर्ण किंवा ITI ची डिग्री असणे आवश्यक आहे. तर लेवल 2 आणि त्यावरील पदांसाठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. यासोबतच वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 पर्यंत किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. म्हणजेच अर्जदाराची जन्मतारीख 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2008 च्या दरम्यान असावी.

5 / 8
निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि खेळातील उपलब्धींवर आधारित असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. प्रथम उमेदवारांच्या खेळातील उपलब्धी पाहिल्या जातील, त्यानंतर स्पोर्ट्स चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांदरम्यान मैदानावरील त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. जे खेळाडू या टप्प्यांना यशस्वीपणे पार करतील, त्यांना शेवटी कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. अंतिम गुणवत्ता यादी पूर्णपणे चाचणी आणि उपलब्धींच्या आधारावर तयार केली जाईल.

6 / 8
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल. लेवल 1 च्या पदांसाठी वेतन 18,000 रुपये प्रती महिना पासून सुरू होईल, तर उच्च स्तरावरील पदांसाठी ते 29,200 रुपये पर्यंत जाऊ शकते.

7 / 8
अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाले तर, सामान्य वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, चाचणीला हजर झाल्यानंतर त्यापैकी 400 रुपये परत केले जातील. तर SC, ST, महिला, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त 250 रुपये आहे, जे चाचणीला हजर झाल्यानंतर पूर्णपणे परत केले जाईल. म्हणजेच, प्रत्यक्षात ही भरती खेळाडूंसाठी जवळपास मोफतच आहे.

8 / 8
अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. उमेदवारांना फक्त अधिकृत वेबसाइट rrcmas.in वर जावे लागेल. तिथे “Sports Quota Recruitment 2025” लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विहित शुल्काचा भरणा करायचा आहे. अर्ज पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील गरजेसाठी त्याची एक प्रत प्रिंट करून ठेवा.