व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी केला अत्यंत मोठा करार, थेट…
Donald Trump deal : व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असून अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे अमेरिकेची बारीक नजर आहे. हेच नाही तर काही महत्वाचे करार दोन्ही देशांमध्ये होण्याच शक्यता आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. फक्त पुतिन हेच नाही तर रशियाचे अनेक मंत्री देखील भारताच्या दाैऱ्यावर आहेत. अमेरिका सतत भारतावर रशियासोबत व्यापार न करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामध्येच आता थेट पुतिन भारतात पोहोचले. संरक्षणापासून ते अनेक व्यापार मुद्द्यांवर यादरम्यान चर्चा होईल. हेच नाही तर महत्वाचे करार होणार आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. रशियाकडून तेल खरेदी बंद करा नाही तर अजून निर्बंध लादू अशी थेट धमकीच भारताला दिली. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. काही महत्वाचे निर्णय होण्याचीही शक्यता आहे.
पुतिन यांच्या भारत दाैऱ्यामुळे तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट उठला आहे. भारत आणि रशियाची मैत्री ही त्यांची मोठी पोटदुखी आहे. इतकेच काय तर रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनवर अमेरिका निर्बंध लादत नाहीये. पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असताना तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत थेट करारच करून टाकला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असताना कांगो आणि रवांडा यांच्यात शांतता करार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने या शांतत कराराला वाशिंग्टन अकॉर्ड्स नाव दिले आहे. हेच नाही तर कांगोने अमेरिकेसोबत रेयर अर्थ मेटल करार देखील साईन केला. अमेरिकेचा डबल फायदा झाल्याचे बघायला मिळतंय. गेल्या 30 दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू होता.
दोन्ही देशांनी या करारावर सही केल्यानंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, दोन्ही देशांनी बराचवेळ एकमेकांना मारण्यात घालवला आहे. आता असे होणार नाही. आता हे एकत्र आले असून अमेरिकेची आर्थिक मदत करून सर्वांचाच फायदा होणार आहे. हा करार करताना अमेरिकेने आपला फायदा करून घेतला असून थेट कांगोसोबत मोठा करार केला आहे.
