AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे हा फोन, इंटरनेटपासून दूर राहण्याबद्दल मोठा खुलासा, कधीच…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. अनेक मोठे करार रशिया आणि भारतात होण्याची शक्यता आहे. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफबद्दलही भाष्य पुतिन करण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे हा फोन, इंटरनेटपासून दूर राहण्याबद्दल मोठा खुलासा, कधीच...
Russian President Vladimir Putin mobile
| Updated on: Dec 05, 2025 | 10:15 AM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल रात्री भारतात दाखल झाले. पुतिन दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर आहेत. पुतिन यांना जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेते म्हणून बघितले जाते. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाते. हेच नाही तर पुतिन ज्या विमानातून प्रवास करतात ते साधे विमान नसून अत्यंत घातक विमान आहे. पुतिन यांची रूम ज्या हॉटेलमध्ये असते, त्या हॉटेलच्या पूर्ण मजला त्यांच्या सुरक्षेसाठी खाली केला जातो.पुतिन आपल्या सुरक्षेसाठी इंटरनेटचाही अजिबात वापर करत नाहीत. सोशल मीडियापासून ते दूर असून त्यांच्याकडे साधा स्मार्टफोन देखील नाहीये. त्यांच्याकडे असलेल्या फोनमध्ये इंटरनेट सुद्धा नाहीये. पुतिन यांनी इंटरनेट न वापरण्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. पुतिन यांनी इंटरनेटच्या विषयावरून अमेरिकेवर गंभीर आरोप केली होती.

पुतिन यांनी इंटरनेटचे वर्णन थेट सीआयए प्रकल्प म्हणून केले होते. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. जी अत्यंत धोकादायक आहे. एप्रिल 2o14 मध्ये व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, इंटरनेट म्हणजे सीआयएचा मोठा प्रकल्प आहे. ज्याच्या माध्यमातून सर्वांवर लक्ष ठेवले जाऊ शकते.

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने इंटरनेय तयार केले आहे आणि त्यांच्याकडून त्याचा अजून विकास केला जात आहे. 2013 च्या सुरुवातीला अमेरिकन गुप्तचर संस्था एनएसएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांनी मोठा खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने अमेरिका सोशल मीडियावर हेरगिरी करते.

रशियाला आपले स्वत: चे एक वेगळे इंटरनेट हवे आहे. पुतिन यांनी बराच काळ आग्रह धरला. सध्याचे इंटरनेट रशियाच्या हितसंबंधांना धोका निर्माण करत आहे, असे त्यांचे मत आहे. रशियाने आपल्या ऑनलाइन हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असे स्पष्ट मत पुतिन यांचे आहे. यामुळे ते सोशल मीडियावर सक्रिय नाहीत आणि ते इंटरनेट असलेला फोन देखील वापरत नाहीत.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ