AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन गुप्तचर संस्था CIA चे भारतात गुप्त ठिकाणे, सिक्रेट फाईलींमधून समोर आले धक्कादायक रहस्य

सीआयएवर युक्रेनसह युरोपातील अनेक देशांमध्ये असे हेरगिरीचे अड्डे तयार करून तेथून काम केल्याचा आरोप आहे. सीआयएने तयार केले हे अड्डे रशियाविरुद्धच्या गुप्तचर कारवायांमध्ये वापरण्यात आल्याची माहिती आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्था CIA चे भारतात गुप्त ठिकाणे, सिक्रेट फाईलींमधून समोर आले धक्कादायक रहस्य
CIA
| Updated on: Mar 20, 2025 | 2:41 PM
Share

अमेरिकन गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (CIA) भारतात काम करत होती. भारतातील काही शहरांमध्ये सीआयएने आपली तळे उघडली होती. ही बाब आता एका सिक्रेट फाईलींमधून समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांची 1963 मध्ये हत्या झाली होती. त्यासंदर्भातील रिकॉर्ड समोर आले आहे. त्यात सीआयएने नवी दिल्ली, कोलकातामध्ये गुप्त तळ निर्माण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यूएस नॅशनल आर्काइव्स एंड रिकॉर्ड्स एडमिनिस्ट्रेशनकडून दिलेल्या या माहितीत भारत आणि जगभरात सीआयआय कुठे कार्यरत होती, त्याची माहिती दिली आहे.

सार्वजनिक झालेल्या माहितीनुसार, सीआएची न्यूयॉर्क डिव्हीजन भारतातील नवी दिल्ली, कोलकातासोबत पाकिस्तानमधील रावळपिंडी, श्रीलंकेतील कोलंबा, इराणमधील तेहरान, दक्षिण कोरियातील सियोल आणि जपानमधील टोकियोमध्ये गुप्त ठिकाणे तयार केली होती. यापैकी काही सुविधा कायदेशीर तपासणीच्या कक्षेत आल्या आहेत.

2,200 जुने कागदपत्रे अपलोड

राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर यूएस नॅशनल आर्काइव्सच्या वेवसाइटवर जवळपास 2,200 जुने कागदपत्रे अपलोड केली आहेत. त्यात जॉन केनडी यांची हत्यासंदर्भातील रेकॉर्ड, फोटोग्रॉफ आणि इतर सामग्री आहे. यापैकी काही माहिती यापूर्वी सार्वजनिक केली होती.

सीआयए गुप्त सुविधा किंवा ब्लॅक साइट्स ऐतिहासिकदृष्ट्या गुप्तचरांच्या कामांसाठी वापरली जाते. ज्यात पाळत ठेवणे, हेरगिरी करणे आणि काही प्रकरणांमध्ये संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेणे आणि त्यांची चौकशी करणे समाविष्ट आहे. सीआयएवर युक्रेनसह युरोपातील अनेक देशांमध्ये असे हेरगिरीचे अड्डे तयार करून तेथून काम केल्याचा आरोप आहे. सीआयएने तयार केले हे अड्डे रशियाविरुद्धच्या गुप्तचर कारवायांमध्ये वापरण्यात आल्याची माहिती आहे.

सीआयए भारतात सक्रीय

बिजनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, सीआयएचा इतिहास भारताचा जुळला होता. विशेषत: अमेरिका आणि रशिया दरम्यान सुरु असलेले शीत युद्ध दरम्यान सीआयए भारतात सक्रीय होती. भारताने 1962 मध्ये चीनी क्षेत्राच्या निगरणासाठी अमेरिकेच्या U-2 या गुप्तचर विमानांना इंधन भरण्यासाठी भारताचे तळ उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी ओडिशामधील चारबतिया एअरबेसचा उपयोग केला गेला होता.

रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, भारत स्वतंत्र झाल्यावर गुप्तचरांचे जाळे निर्माण करण्यासाठी अमेरिकेची मदत मागितली होती. 1949 मध्ये भारताच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख टी जी संजीवी हे चीनवर लक्ष ठेवण्यासाठी सीआयएसोबत काम करत होते. 1950 मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळवला. त्यानंतर भारतावर सीआयएच्या मदतीने तिबेट सैनिकांना मदत केल्याचा आरोप केला जात आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.