MPSC चा धडाका सुरुच, सार्वजनिक आरोग्य विभागातील 145 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

| Updated on: Mar 20, 2022 | 10:13 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department)विविध पदांसाठी विविध जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्यात आहेत.

MPSC चा धडाका सुरुच, सार्वजनिक आरोग्य विभागातील  145 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
एमपीएससीची मोठी भरती
Image Credit source: mpsc website
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department)विविध पदांसाठी विविध जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्यात आहेत. सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी प्रणालीवर अर्ज दाखल करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. सांख्यिकी अधिकारी पदासाठी 23 जागा, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदासाठी 49 जागा तर, प्रशासकीय अधिकारी पदासाठी 73 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वेबसाईटला भेट देऊन जाहिरात वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावेत.

प्रशासकीय अधिकारी च्या 73 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्रशासकीय अधिकारी, गट ब संवर्गातील 73 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्रशासकीय अधिकारी, गट ब संवर्गातील 73 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी 21 मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून 10 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील.

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदाच्या 49 जागा भरणार

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, गट ब संवर्गातील 49 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरातप्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तर, आरोग्य शिक्षण विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय लोकशिक्षण आणि प्रसिद्धी या संदर्भातली अनुभव असणं आवश्यक आहे.

सांख्यिकी अधिकारी पदाच्या 23 जागांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सांख्यिकी अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार सांख्यिकी, अर्थशास्त्र आणि इतर विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

आरोग्य विभागाचा प्रताप, आशा सेविकांना रबराचं लिंग दिलं! मंत्री राजेंद्र शिंगणेंचे कारवाईचे आदेश

Asani Cyclone : असानी चक्रीवादळामुळं अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट