AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Alert 2026: चुकीची माहिती देऊन काढला PF चा पैसा? EPFO वसूल करणार रक्कम? दंडासह मोठी कारवाई?

EPFO Alert 2026: चुकीची माहिती अथवा खोटे कारण देऊन जर तुम्ही पीएफ रक्कम काढली तरी कुणालाच कळणार नाही असं होत नाही. खोटे कारण समोर आल्यास तुमच्यावर दंडाची नाही तर ही मोठी कारवाई होऊ शकते. काय आहे मोठी अपडेट?

EPFO Alert 2026: चुकीची माहिती देऊन काढला PF चा पैसा? EPFO वसूल करणार रक्कम? दंडासह मोठी कारवाई?
ईपीएफओ अलर्टImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 08, 2026 | 9:25 AM
Share

EPFO Alert 2026: जर तुम्ही चुकीची आणि खोटी माहिती देऊन पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर सावध व्हा, कारण असे प्रकार केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खपवून घेत नाही. जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि त्यासाठी योग्य कारण तुमच्याकडे असेल तर चिंता नाही. पण तुम्ही जर चुकीची आणि खोटी माहिती देऊन पीएफ रक्कम काढली तर त्याचा फटका बसू शकतो. संघटनेने EPF सदस्यांना याविषयीचा इशारा दिला आहे. EPFO ने समाज माध्यमावर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, ईपीएफचा पैसा काढण्यासाठी चुकीची माहिती दिली तर त्याचा फटका बसू शकतो. अशा प्रकरणात दंडासह मोठी कारवाई होते.

ईपीएफओने काय दिला इशारा?

ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, चुकीच्या कारणं देऊन PF चा पैसा काढला तर EPF योजना 1952 अंतर्गत ही रक्कम वसूल करण्यात येते. इतकेच नाही तर पुढे काही वर्षे रक्कम काढण्यावरही प्रतिबंध येतो. तसेच पीएफ सदस्याला दंडाची रक्कमही भरावी लागते. भविष्याच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक परिस्थितीच योग्य कारण देऊन पीएफ पैसा काढा असे आवाहन ईपीएफओने केले आहे. पीएफ हे भविष्याचे सुरक्षा कवच असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

जाणून घ्या केव्हा काढता येतो पैसा

ईपीएफ योजना 1952 मध्ये याविषयीचे नियम स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ठराविक कारणासाठी तुम्ही पीएफ रक्कम काढू शकता.

लग्न (स्वत:च, मुलाचं, भाऊ आणि बहीण)

मुलांच्या शिक्षणासाठी

गंभीर आजार असल्यास

घर खरेदी अथवा घर दुरुस्ती, घराचं बांधकाम

या कारणासाठी तुम्हाला पीएफची रक्कम काढता येते. जर तुम्ही ही रक्कम इतर कारणासाठी खर्च केली तर ईपीएफओ तुमच्याकडून ही रक्कम पूर्णपणे वसूल करू शकते. तर तुम्ही जितकी रक्कम काढली. त्यावर व्याज सुद्धा आकारले जाते. तर याप्रकरणी दंडही वसूल केली जाते.

नियम 68B(11)काय सांगतो?

ईपीएफ नियम 68B(11) अंतर्गत जर रक्कमेचा चुकीचा वापर झाल्यास आणि तसे आढळून आल्यास म्हणजे पीएफ रक्कम काढण्यासाठी जे कारण दिले त्यासाठीच ती रक्कम खर्च न झाल्यास पीएफ सदस्याला दंड आकारण्यात येणार आहे. तर असे सदस्य पुढे तीन वर्षांपर्यंत पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाहीत. तर जी रक्कम काढली, तिच्यावर व्याजाची रक्कमही जमा करावी लागेल. पीएफ खाते हे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आहे हे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...