AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न

Marathi Langugae Row : काल कांदिवली लिंक रोडवर लालजी पाडा येथे रिक्षा चालकांनी बेकायद आंदोलन केलं. त्यांनी रिक्षा रोखून ट्रॅफिक जॅम केलं. मराठी बोलणार नाही अशी मुजोरी हे रिक्षा चालक दाखवत होते.

Marathi Langugae Row : 'ही शेवटची नम्र विनंती', दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
MNS Raj Thackeray
| Updated on: Aug 25, 2026 | 1:27 PM
Share

मराठी सक्तीवरुन आंदोलनं करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. काल कांदिवली लिंक रोडवर लालजी पाडा येथे रिक्षा चालकांनी बेकायद आंदोलन केलं. त्यांनी रिक्षा रोखून ट्रॅफिक जॅम केलं. मराठी बोलणार नाही अशी मुजोरी हे रिक्षा चालक दाखवत होते. आता या अमराठी रिक्षाचालकांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. कांदिवली पश्चिममध्ये मनसेने अमराठी रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. ‘मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, ही शेवटची नम्र विनंती’. संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असा इशारा बॅनरवरुन देण्यात आला आहे. कांदिवली पश्चिममध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावले आहेत. ‘अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा…!!’ असं या बॅनरवर लिहिलं आहे. मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हे बॅनर लावले असून अमराठी चालकांनी मराठीचा सन्मान करावा असा इशारा त्यांनी दिला आहे.

अमराठी ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा

दरम्यान अमराठी रिक्षा चालकांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने अमराठी ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत. काल मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अमराठी रिक्षा चालकांनी आरटीओच्या कारवाईला विरोध करत संप पुकारला होता. या संपादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ आणि हंगामा झाल्याचे पाहायला मिळाले होते.आरटीओकडून मराठी भाषा संदर्भात सुरू असलेल्या कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत.

किमान मराठी बोलता यावं, अशी या रिक्षा चालकांकडून अपेक्षा आहे. पण इतकी व्यवहारिक मराठी सुद्धा न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरु झाली आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...