AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासरा असावा तर असा… जावयावर पाडला सोन्याचा पाऊस, थेट सोन्याची चेन, अंगठी, ब्रेसलेट आणि…

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचा टिळा समारंभ शाही अंदाजात पार पडला. यावेळी त्यांनी जावई ऋषिकेश कुमार यांना सोन्याचे दागिने, चांदीचे जेवणाचे ताट आणि कोट्यवधींची लँड रोव्हर डिफेंडर कार भेट दिली. या 'सोन्याच्या पावसामुळे' हा शाही सोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

सासरा असावा तर असा... जावयावर पाडला सोन्याचा पाऊस, थेट सोन्याची चेन, अंगठी, ब्रेसलेट आणि...
Anant Singh daughter engagementImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 11:30 AM
Share

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हिचा काल टिळा लावण्याचा कार्यक्रम अत्यंत धुमधडाक्यात पार पडला. हा सोहळा शाही अंदाजात पार पडला. टिळा लावण्याच्या कार्यक्रमात अनंत सिंह यांचे जावई ऋषिकेश कुमार हे पारंपारिक रेशमी धोती आणि कुर्त्यात दिसून आले. यावेळी अनंत सिंह यांनी नवरदेव आणि नवरीला भरभरून आशीर्वाद दिले. एवढेच नव्हे तर अनंत सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला अत्यंत महागडे गिफ्टही दिले. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात या गिफ्टची चर्चा सुरू आहे.

टिळ्याच्या कार्यक्रमाला ऋषिकेश कुमार हे मॉर्डन सूट आणि टायमध्ये येतील असं सर्वांना वाटत होतं. पण ऋषीकेश कुमार यांनी बिहारी पंरपरेनुसार धोती, कुर्ता आणि स्टोल परिधान केला होता. त्यांचा देसी अंदाज आणि निरागसता सर्वांना मोहून टाकत होती. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात ऋषिकेश कुमार आणि शिवांगी अत्यंत सुंदर दिसत आहे. तसेच या व्हिडीओतून कार्यक्रमाचा उत्साहही पाहायला मिळत आहे.

किती सोनं मिळालं?

टिळ्याच्या कार्यक्रमात अनंत सिंह यांनी जावयावर जणू सोन्याचा पाऊसच पाडला. जावई ऋषिकेश कुमार यांना सोन्याचं ब्रेसलेट, चेन आणि अंगठी दिली. तसेच त्यांना कोट्यवधीची डिफेंडर कारही भेट म्हणून दिली. अनंत सिंह यांना जावयाला लग्नात जेवण्यासाठी चांदीचे नक्षीदार ताट, कटोरा, ग्लास आणि सोन्याची परत असलेली विशेष भांडीही भेट म्हणून दिली आहेत.

लँड रोव्हर कार

यात कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिली ती कोट्यवधी रुपयांची कार. अनंत सिंह यांनी जावयाला ब्रँड न्यू लँड रोव्हर डिफेंडर कार भेट म्हणून दिली. अमेरिका रिटर्न जावयासाठी ही खास भेट होती. पांढऱ्या रंगाची कार फुलांनी सजवलेली होती.

या कार्यक्रमात बिहारचे सर्वात प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि अभिनेता गुंजन सिंह आणि अभिनेत्री क्वीन शालिनीही आले होते. यावेळी गुंजन सिंह आणि क्वीन शालिनी यांनी हा समारंभ चांगलाच एन्जॉय केला. दोघांनीही डान्स करून संपूर्ण माहौलच बदलून टाकला.

शेकडो लोकांची उपस्थिती

अनंत सिंह यांच्या घरच्या लग्नाची गेल्या महिन्याभरापासून देशभरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या लग्नाची प्रत्येक अपडेट लोक घेत आहेत. काल तर टिळ्याच्या कार्यक्रमालाही शेकडो लोक आले होते. पाहुणे आणि बघ्यांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती. यावेळी शुद्ध देशी तुपातील मिठाया सर्वांना देण्यात आल्या. तसेच या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...