AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...

पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज…

| Updated on: Nov 21, 2026 | 9:09 AM
Share

पुण्यात थंडीचा जोर वाढला असून, किमान तापमान 11.3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वरपेक्षाही पुणे अधिक गारठले आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात तीव्र गारठा जाणवत असून, पुढील दोन दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी पुण्यातील किमान तापमानाचा पारा 11.3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला. विशेष म्हणजे, पुण्यातील किमान तापमान प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी नोंदवले गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडीचा अनुभव येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, शहरातील किमान तापमान सुमारे 11.3 अंश सेल्सिअसवर आले आहे, ज्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. पुणे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस थंडीची हीच तीव्रता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळ आणि रात्रीच्या वेळी अधिक गारठ्याचा अनुभव येऊ शकतो.

Published on: Nov 21, 2026 09:09 AM

Follow Us