AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule: गोवंश वाचवण्यासाठी फडणवीस सरकारचा धडाडीचा निर्णय, कत्तल केल्यास थेट… चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Chandrashekhar Bawankule on Cow:गोशाळा जमीन खरेदी नोंदणी ही कृषी दरानेच होणार असा धडाडीचा निर्णय घेतल्यानंतर आता गायींची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांविरोधात राज्य सरकार आक्रमक झाले आहे. अशा व्यक्तींविरोधात मोठी कारवाई करण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule: गोवंश वाचवण्यासाठी फडणवीस सरकारचा धडाडीचा निर्णय, कत्तल केल्यास थेट... चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
गोवंश वाचवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, कत्तल केल्यास थेट...
| Updated on: Nov 21, 2026 | 11:16 AM
Share

Chandrashekhar Bawankule on Cow: राज्यातील गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दर लागू होणार नाहीत. तसेच रहिवाशी दरही लागू नसतील. तर कृषी दर लागू होतील. गोशाळेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारने हा धडाडीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय घेतानाच राज्य सरकारने गायींची कत्तल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. कत्तलीसाठी गायींची खरेदी करणाऱ्यांविरोधात आता थेट मोक्का लावण्यात येणार आहे.

गोशाळा ही सेवाभाव जपते. गोवंश नष्ट करणाऱ्यांकडून गाई सोडवून गोशाळा चालते. गोशाळेला चारा लागवड करावी लागते. हा एक प्रकाराचा कृषी व्यवसाय आहे. मला असं वाटतं की या व्यवसायाला, सेवाभावाला शासन अनुदानही देतं. अशावेळी गोशाळाच्या जमिनीकरता घेतलेला कोणताही व्यवसाय असेल. तो कृषीदरानेच होईल. तो रहिवाशी जमीन खरेदी-विक्री दराने होणार नाही. यापूर्वी याविषयी कोणतीही स्पष्टता नव्हती. त्यामुळे व्यावसायिक अथवा रहिवाशी दर लावण्यात येत होते. पण गोशाळा या शंभर टक्के सेवाभावी आहे. त्यामुळे गोशाळा जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना व्यावसायिक दर लावण्यावर बंदी घातल्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

डीपीसीच्या माध्यमातून २५ लाखांचे अनुदान

आता तर आम्ही विचार केला आहे की, डीपीसीच्या माध्यमातून अधिकृत गोशाळांना २५ लाख रुपये अनुदान देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे. त्यामुळे गोशाळा चालवणे सोपे जाईल. असा एक निर्णय आपण केला आहे. जास्तीत जास्त गोशाळा व्हाव्यात. गोवंश वाढावा. गोवंश कापल्या जाणार नाही. काही कारणामुळे अथवा घाबरून जे गोवंश विक्री करतात, ते गोशाळेला गायी देतील. सरकार जनावरांसाठी संपूर्ण व्यवस्था करत आहे. पाणी, चाऱ्याची, गोवंशासंबंधी व्यवस्था करत आहे. आता दुष्काळाचा फायदा घेऊन काही जण शेतकऱ्यांकडे जात आहेत. त्यांच्याकडे जनावरांची मागणी करत आहेत. गोवंश पोसण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. गोशाळेने जबाबदारी घेतली आहे, गोवंश पोसण्याची. चारा लागवडीची आणि चारा देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे, असे महसूलमंत्री म्हणाले

गोवंश कत्तल करणाऱ्यांवर थेट मोक्का

राज्यात गोवंश कापणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. दुष्काळाचा हे लोक फायदा घेत आहेत. त्यांच्यावर आम्ही मोक्का लावू. गोवंश खरेदी करणारे, कापणारे यांच्यावर मोक्का लावणार असल्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ज्यांनी गाय कापण्यासाठी तिची खरेदी केली. त्याच्यावर मोक्का लावणार असा सज्जड इशाराच बावनकुळे यांनी दिला. या करिता आम्ही गोशाळांना प्रोत्साहन देत आहोत. त्यांना बळ देत आहोत. चारा लागवड करत आहोत. चारा पुरवत आहोत.शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार आहे. आमचं मंत्रिमंडळ शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. गोशाळेला मजबूत करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर