Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
Kitchen Hacks : आता सण सुरु होतील, त्यामुळे प्रत्येक महिलेला एकच प्रश्न सतावत असेल आणि तो म्हणजे साफसफाई कशी करायची. अनेक कामाच्या गडबडीत आपण थोडक्यात सफाई करतो. अशात फरशीवरचे हट्टी डाग निघतच नसतील तर, काही घरगुती उपाय करून तुम्ही सफाई करु शकता.

five easy kitchen hacks for clean tiles fourth one is best
Kitchen Hacks : आता सर्व सण सुरु होतील. त्यामुळे महिला साफसफाईच्या मागे धावतील. पण साफसफाई करताना फरशीवरील हट्टी डाग घालवणं फार कठीण असतं. किचनच्या फरशीवरील डाग घालवणं तर फार कठीण असतं. अनेक लोक हे हट्टी डाग पटकन काढण्यासाठी बाजारातून ॲसिड किंवा तीव्र रसायने विकत घेतात. यामुळे डाग कदाचित फिके पडतील, पण फरशांवरील चकाकी खराब होते आणि फरशी कायमची फिकट पडते. कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे रसायने असतात. पण कही सोप्या टिप्स लक्षात घेतल्या तर तुम्ही सहज, फरशीवरील डाग घालवू शकता आणि तुम्हाला फरशा सुरक्षितपणे नव्यासारख्या चमकदार करता येतील.
फरशीवरील हट्टी डाग घालवण्याचे उपाय
बेकिंग सोडा आणि पाणी: एका वाटीत तीन मोठे चमचे बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट काळ्या डागांवर लावा आणि 10 – 15 मिनिटं तशीच राहू द्या. त्यानंतर, डिस्पोजेबल टूथब्रशने हलक्या हाताने घासून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवा. डाग नाहीसा होईल.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर: जुन्या आणि हट्टी डागांसाठी हे एक उत्तम मिश्रण आहे. सर्वप्रथम, फरशांच्या खाचांमध्ये कोरडा बेकिंग सोडा टाका. आता, एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धे पाणी आणि अर्धे पांढरे व्हिनेगर मिसळा आणि ते फरशीवर फवारा. लगेचच बुडबुडे तयार होऊ लागतील. फेस खाली बसल्यावर, ब्रशने घासून घ्या आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइड: बाथरूममधील दमटपणामुळे, फरशीच्या खाचांमध्ये काळी बुरशी जमा होते. अशावेळी, बेकिंग सोड्यामध्ये थोडे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून लावा. हे ब्लीचप्रमाणे काम करते. जर तुम्ही ते 10 मिनिटं तसंच ठेवलं आणि नंतर ब्रशने घासलं, तर खाचा पुन्हा पांढऱ्या होतील.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा: हा सर्वात सोपा उपाय आहे. बेकिंग सोडा लिंबाच्या रसात मिसळा आणि डागावर लावा. लिंबामधील आम्ल केवळ डागच काढणार नाही, तर जमा झालेले जीवाणू देखील नष्ट करेल. १५ मिनिटांनंतर धुतल्यास, पिवळा डाग निघून जाईल आणि फरशीला चांगला सुगंधही येईल. पण, सर्व प्रकारच्या फरशांसाठी हीच पद्धत वापरणे योग्य नाही. संगमरवरी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक दगडाच्या फरशांवर व्हिनेगर किंवा लिंबासारखे आम्लयुक्त पदार्थ न वापरण विशेषतः चांगलं.
डिशवॉशिंग लिक्विड आणि गरम पाणी: स्वयंपाकघरातील फरशीच्या खाचांमध्ये तेलकट घाण साचली असल्यास, एका बादलीभर गरम पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड साबणाचे काही थेंब विरघळवा. हे पाणी त्यावर ओता आणि तेलकट थर विरघळवून स्वच्छ करण्यासाठी ब्रशने घासा. हे घरगुती उपाय तुम्ही करु शकता.
