NICL मध्ये नोकरीची संधी! 90 हजार पगार, कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा…

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच NICL ने प्रशासकीय अधिकारी (AO) पदासाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.

NICL मध्ये नोकरीची संधी! 90 हजार पगार, कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा...
Jobs
Image Credit source: Peter Dazeley/The Image Bank/Getty Images
| Updated on: Jun 15, 2025 | 6:41 PM

बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच NICL ने प्रशासकीय अधिकारी (AO) पदासाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार NICL nationalinsurance.nic.co.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

NICL AO पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 3 जुलै आहे. या भरती मोहिमेद्वारे 266 पदे भरली जाणार आहेत. यातील काही पदे ही, डॉक्टर, वित्त तज्ञ, माहिती तंत्रज्ञान तज्ञ आणि ऑटोमोबाईल अभियंते यांच्यासाठी असणार आहेत. यासाठी फेज 1 परीक्षा 20 जुलै रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा किती?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मे 2025 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.

परीक्षेचे स्वरूप

प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत 100 गुणांसाठी बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 60 मिनिटांच्या कालावधी मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही मुख्य परीक्षा असणार आहे. 250 गुणांसाठी बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असणार आहेत. 30 गुणांसाठी दीर्घ उत्तरासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्शनल दोन्ही परीक्षा ऑनलाइन असणार आहेत. उमेदवारांना संगणकावर टाइप करून डिस्क्रिप्शनल परीक्षेचे उत्तर द्यावे लागणार आहे. यानंतर मुलाखत होईल. उमेदवारांचे सर्व (टप्पा 1, टप्पा 2, मुलाखत) गुण एकत्र केले जातील आणि त्यानंतर निवड यादी जाहीर केली जाणार आहे.

पगार किती?

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी मूळ वेतन 50925 रुपये आहे.मूळ वेतनाव्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना विविध भत्ते मिळतात, ज्यात गृहनिर्माण आणि वाहतूक भत्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे महानगरीय भागातील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सुमारे 90000 असू शकते.