Gadchiroli Police | गडचिरोली पोलीस शिपाई पदासाठी भरती, पोलीस मुख्यालयात आज 17 हजार उमेदवार देणार परीक्षा

| Updated on: Jun 19, 2022 | 10:03 AM

सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत सामान्य क्षमता चाचणीचा पेपर होईल. दुपारी अडीच ते चार वाजतापर्यंत गोंडी भाषेवरील पेपर होणार आहे. पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचता यावे, यासाठी बाहेरगावचे उमेदवार आधीच गडचिरोलीत पोहचले आहेत. त्यांनी मित्र, नातेवाईक तसेच सार्वजनिक ठिकाणांचा आश्रय घेतला आहे.

Gadchiroli Police | गडचिरोली पोलीस शिपाई पदासाठी भरती, पोलीस मुख्यालयात आज 17 हजार उमेदवार देणार परीक्षा
गडचिरोली पोलीस शिपाई पदासाठी भरती
Follow us on

गडचिरोली : जिल्हा पोलिस दला अंतर्गत 136 पोलीस शिपाई पद भरतीच्या प्रक्रियेसाठी सामान्य समता चाचणी व गोंडी-माडिया पेपर असे दोन परीक्षा आजचं पोलीस विभागानं ठेवले आहेत. जिल्ह्यात पोलीस जिल्हा पोलीस मुख्यालय (District Police Headquarters) कॅम्पसमध्ये ही परीक्षा होणार आहे. सामान्य क्षमता चाचणी परीक्षा साडेदहा वाजता, गोंडी-माडिया परीक्षा (Gondi Exam) दुपारी दोन वाजता घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांत 17 हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या 136 जागांसाठी रविवारी परीक्षा होत आहे. जिल्ह्यातील 16 हजार 848 युवक-युवती ही परीक्षा देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यतील 16 परीक्षा केंद्रांवर (Examination Center) ही परीक्षा होत आहे. चार वर्षानंतर जिल्ह्यात पोलीस भरती होत आहे. त्यामुळं उमेदवारांनी चांगलीच तयारी केली आहे. एका जागेसाठी सुमारे 125 जण परीक्षा देत आहेत. या 16 केंद्रांवर सुमारे दोन हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्र कुठे आहेत

नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय बोधली, सुमानंद हॉल आरमोरी रोड, शासकीय महाविद्यालय इंदाळा, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल आरमोरी रोड, बियाणी विद्यानिकेतन स्कूल, नवेगाव, शासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड, शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड, सुप्रभात मंगल कार्यालय आरमोरी रोड, शिवाजी हायस्कूल गोकुलनगर, पोलीस मुख्यालय कॉम्प्लेक्स, बांबू प्रकल्प कार्यालय एमआयडीसी, कार्मेल हायस्कूल साईनगर, आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल सेमाना मार्ग, शासकीय आयआयटी चंद्रपूर रोड, स्कूल ऑफ कॉमर्स धानोरा रोड ही परीक्षा केंद्र आहेत.

उमेदवार पोहचले गडचिरोलीत

पावसाची शक्यता असल्यानं दोनशे खोल्यांमध्ये ही परीक्षा होत आहे. 21 मेपासून भरतीसाठी अर्ज भरले गेले. पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन येथे अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज भरण्यासाठी पोलीस विभागानं विशेष व्यवस्था केली होती. सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत सामान्य क्षमता चाचणीचा पेपर होईल. दुपारी अडीच ते चार वाजतापर्यंत गोंडी-माडिया भाषेवरील पेपर होणार आहे. पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचता यावे, यासाठी बाहेरगावचे उमेदवार आधीच गडचिरोलीत पोहचले आहेत. त्यांनी मित्र, नातेवाईक तसेच सार्वजनिक ठिकाणांचा आश्रय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातलेच

गडचिरोली जिल्हावर आधारित व गडचिरोली जिल्ह्यातील मोठा मुद्दा असलेला नक्षलवाद्यांवर आधारित या परीक्षेचे प्रश्न असणार आहेत. त्यासाठी गडचिरोली जिल्हावासीच अर्ज करू शकतो अशी अट पोलीस विभागाने लावली होती. या दोन परीक्षा आज पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडत आहेत. यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्राउंडवर फिजिकल टेस्ट घेण्यात येईल. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडक सुरक्षेत पोलीस विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी ही परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवणार आहे.