रेल्वेत बंपर भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्वरित…

Railway Recruitment Process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची संधीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक.

रेल्वेत बंपर भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्वरित...
Railway
| Updated on: Sep 27, 2024 | 2:28 PM

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याची स्वप्न असते. आता तेच स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरती किंवा मेगा भरतीच म्हणावी लागेल. तीन हजाराहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.

रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया 3445 पदांसाठी आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जातील. यामध्ये  तिकीट लिपिक, लेखा लिपिक, टंकलेखक, ट्रेन लिपिक,  कनिष्ठ लिपिक अशी विविध पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 

RRB NTPC साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावी पास उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 33 वयोगटातील उमेदवार या भरती प्रकियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 

प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडीसी सूट देण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमा भरतीसाठी अर्ज करावी लागतील. rrbapply.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील.