SBI PO Final Result 2020-21: स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल 

| Updated on: Mar 17, 2021 | 3:02 PM

SBI PO Final Result: SBI प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा अंतिम निकाल sbi.co.in जाहीर झाला आहे.

SBI PO Final Result 2020-21: स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल 
स्टेट बँक
Follow us on

नवी दिल्ली: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर अंतिम परीक्षा 2020-21 (SBI PO Final Result 2021 ) चा निकाल जाहीर केला आहे. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा निकाल उमेदवारांना स्टेट बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in/careers वर पाहता येणार आहे. उमेदवारांना निकाल पाहायचा असल्यास वेबसाईटवर नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लॉगीन करावं लागेल.  (SBI PO Final Result 2020-21 Declared how will you check your name)

2 हजार जणांची निवड होणार

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून फेब्रुवारी महिन्यात प्रोबेशनरी ऑफिसर्स अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा 2020-21 दोन हजार पदांसाठी घेण्यात आली होती. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेत क्वालिफाय झालेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली होती. .

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स जेवढ्या पदांची भर्ती करायची आहे त्याच्या दहापट उमेदवारांना मुख्य परीक्षेला संधी दिली जाते.

प्रोबेशनरी ऑफिसर्स अंतिम परीक्षेचा निकाल कसा पाहणार

1. उमेदवारांना प्रथम sbi.co.in/careers या वेबासाईटवर जावं लागेल
2. होमपेजवर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर अंतिम परीक्षा निकाल अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा
3. यानंतर नवीन विंडो ओपन होईल
4. नव्या विंडोमध्ये पीडीएफ ओपन होईल. त्यामध्ये नोंदणी क्रमांक टाकून तुमचं नाव तपासा

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदाची जाहिरात नोव्हेंबर 2020 मध्ये जारी करण्यात आली होती. अर्ज भरण्याची मुदत 4 डिसेंबर पर्यंत होती. जानेवारी महिन्यात पीओ परीक्षेचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी तर अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. स्टेट बँकेकडून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये अप्रेंटिस परीक्षा

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अप्रेंटिस भरती परीक्षेचे आयोजन एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे. काही कारणांमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, उमेदवारंनी नव्या माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या

SBI PO Prelims Result 2021: स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

SBI, PNB आणि AXIS बँकेनं व्याजदर बदलले, जाणून घ्या कुठे मिळतो FD वर जास्त फायदा

(SBI PO Final Result 2020-21 Declared how will you check your name)