SSC CGL Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल टियर 1 परीक्षेच्या तारखा जाहीर, ऑगस्ट महिन्यात परीक्षा

| Updated on: Jul 04, 2021 | 6:53 PM

स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या तारखांची घोषणा कली आहे.

SSC CGL Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल टियर 1 परीक्षेच्या तारखा जाहीर, ऑगस्ट महिन्यात परीक्षा
SSC
Follow us on

SSC CGL Recruitment 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या तारखांची घोषणा कली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान केलं जाणार आहे. (SSC CGL Recruitment 2020 Exam Date declared for CGL Tier 1 Exam  Click here for more Details)

एसएससी सीजीएल परीक्षा 2020 साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. 29 डिसेंबर 2020 ला या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली होती. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन जारी करुन परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता ते उरलेल्या कालावधीमध्ये परीक्षांची तयारी करु शकतात.

6506 पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जारी केलेल्या नोटिफिकेशनुसार 13 ते २४ ऑगस्ट दरम्यान परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. एकूण 6506 पदांसाठी परीक्षांचं आयोजन केलं जाईल. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज दाखल केला असेल त्यांना काही दिवसांनंतर ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

परीक्षेचं स्वरुप

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएलच्या टियर 1 परिक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होते. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील केलं जातं. सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, इंग्रजी, गणितीय क्षमता यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विभागावर 25-25 प्रश्न विचारले जातात.

कोणत्या पदांवर भरती होणार?

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी अन्वेषण ब्यूरो, सहायक विभाग अधिकारी रेल्वे मंत्रालय, सहायक विभाग अधिकारी परराष्ट्र, सहाय्यक इतर विभाग, आयकर निरीक्षक सीबीडीटी, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, उपनिरीक्षक सीबीआय, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी महसूल विभाग, निरीक्षक टपाल विभाग, सहाय्यक इतर मंत्रालय या पदांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

इतर बातम्या:

PHOTO | Investment | पीपीएफ खाते उघडण्यात कुठे आहे अधिक फायदा, जाणून घ्या बँक की पोस्ट ऑफिस?

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

SSC CGL Recruitment 2020 Exam Date declared for CGL Tier 1 Exam  Click here for more Details