AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. (Pushkar singh Dhami)

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश
Pushkar singh Dhami
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 5:45 PM
Share

डेहराडून: पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत सतपाल महाराज, हरक सिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तसेच वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह आणि सुबोध उनियाल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. (Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.

आधी सतपाल महाराजांना भेटले

धामी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याने सतपाल महाराज नाराज झाले होते. त्यामुळे पदाची शपथ घेण्यापूर्वी धामी यांनी सतपाल महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सतपाल महाराजही मंत्रिमंडळात येण्यास तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत धामी?

पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत एबीव्हीपीमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे. धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. राज्यातील तरुण नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

संबंधित बातम्या:

पुष्कर सिंह धामी यांच्याकडे उत्तराखंडची सूत्रे, राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

उत्तराखंडात 10 वर्षात 6 मुख्यमंत्री बदलले; कारण काय? वाचा सविस्तर

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडेच्या पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘ही’ 2 नावं शर्यतीत

(Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक