तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडेच्या पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘ही’ 2 नावं शर्यतीत

भाजपशासित उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री तीरथ सिंह (Tirath Singh Rawat) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला. त्यामुळे भाजप उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी कुणाल निवडणार असा प्रश्न विचारला जातोय.

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडेच्या पुढचा मुख्यमंत्री कोण? 'ही' 2 नावं शर्यतीत


देहरादून : भाजपशासित उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री तीरथ सिंह (Tirath Singh Rawat) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला. यानंतर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) राज्यात राजकीय संकट निर्माण झालंय. तीरथ सिंह रावत यांनी संवैधानिक संकट असल्याचं सांगत राजीनामा दिलाय. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केलाय. त्यामुळे हा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास भाजप उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी कुणाल निवडणार असा प्रश्न विचारला जातोय (Know who will next CM of Uttarakhand after Tirath Singh Rawat).

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यासहन भाजपच्या काही नेत्यांना दिल्लीत बोलावणं केलं. यानंतर तीरथ सिंह रावत यांना दिल्लीला जाऊन भाजप अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याशिवाय भाजप नेते सतपाल सिंह आणि धनसिंह रावत यांनाही दिल्लीला बोलावण्यात आलं. त्यामुळे तीरथ सिंह यांच्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी या दोघांपैकीच एकाची निवड होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. धनसिंह रावत आणि सतपाल सिंह यांच्या व्यतिरिक्त पुष्कर धामी हेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. मात्र, सतपाल सिंह आणि धनसिंह हे दोघे या पदाच्या दावेदारीत सर्वात आघाडीवर आहे.

रावत यांनी भाजप अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात संविधानाच्या कलम 164-अ चा उल्लेख करत तीरथ सिंह रावत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.”

पहिले मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना राजीनामा का द्यावा लागला होता?

मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्यावर उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा भाजपचे नेते त्रिवेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 4 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला.

यानंतर तीरथ सिंह रावत यांनी 10 मार्च रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीरथ सिंह रावत पौरी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण ते या शर्यातीतच नव्हते. आता नव्याने येणाऱ्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यासमोर उरलेले दिवस कारभार पाहण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

या स्टोरीत त्रिवेंद्रसिंग रावत यांनी कधी शपथ घेतली, त्यानंतर कधी राजीनामा द्यावा लागला, नंतर तिरथसिंह रावत यांनी कधी शपथ घेतली, आता राजीनामा का द्यावा लागतोय, उद्या तिसरा मुख्यमंत्री येईल तर त्याच्यासमोर काय स्थिती असेल असे मुद्दे यावेत.

हेही वाचा :

उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा

चर्चा महाराष्ट्र सरकारवरच्या संकटाची, पण संकटात भाजपचं उत्तराखंड सरकार, काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची नामुष्की?

कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

व्हिडीओ पाहा :

Know who will next CM of Uttarakhand after Tirath Singh Rawat

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI