देहरादून : गेल्या काही काळापासून म्हणजेच महाराष्ट्रात सरकार ठाकरे सरकार अस्तित्वात आलंय तेव्हापासून ते पडण्याची चर्चा आहे. भाजपचे नेते नारायण राणे हे तर दर काही दिवसांनी सरकार पडण्याची एक नवी तारीख देतात. पश्चिम बंगालमध्ये ममतांचा पराभव होताच महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारचा निकाल लागणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्या आताही थांबल्यात असं नाही. गुप्त बैठका, नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या आणि भाजप नेत्यांचे ठाकरे सरकारवरचे हल्ले पहाता, अजूनही महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्याची आणि त्यावर आलेल्या संकटाची चर्चा होतेय. पण आज अचानक भाजपचं उत्तराखंडमधलं सरकार संकटात सापडलंय. अवघ्या काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ भाजपावर आलेली आहे (Know why BJP need to select third CM for Uttarakhand in single term).