UPSC Application 2021: यूपीएसीतर्फे अभियांत्रिकी सेवा, जिओ सायंटिस्ट पदासाठी परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर, 439 पदांवर भरती

| Updated on: Sep 22, 2021 | 3:06 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.

UPSC Application 2021: यूपीएसीतर्फे अभियांत्रिकी सेवा, जिओ सायंटिस्ट पदासाठी परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर, 439 पदांवर भरती
यूपीएससी
Follow us on

UPSC Application 2021 नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. जे पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते यूपीएससीच्या upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 247 जागा आणि जिओ सायंटिस्टसाठी 192 जागांवर भरती होणार आहे.

महत्वाच्या तारखा

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6:00 पर्यंत वेळ दिला जाईल. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीखही तीच असेल.

जिओ सांयटिस्ट परीक्षा 20 फेब्रुवारीला

जिओ सायंटिस्टसाठी प्रीलिम्स परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल तर अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेपूर्वी आयोगाकडून प्रवेशपत्र दिले जातील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

स्टेप 1 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in वर भेट द्या
स्टेप 2 : वेबसाइटच्या होमपेजवरील Examination लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : अभियांत्रिकी सेवा आणि जिओ सायंटिस्ट परीक्षा यासमोरील लिंक वर क्लिक करा.
स्टेप 4 : नोंदणी केल्यानंतर अर्ज दाखल करा
स्टेप 5 : परीक्षा फी जमा केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या

पात्रता

जिओ सायंटिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भूशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय इतर अटी यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी सेवांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in ला भेट देऊ शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावं. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेतून नियमाप्रमाणं सूट दिली जाणार आहे.

अर्ज फी

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021 आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने जिओ सायंटिस्ट पदासाठी अर्ज करण्यासाठी 200 रुपये फी जमा करावी लागेल. इतर प्रवर्गातील उमेदवारांना फीतून सूट देण्यात आली आहे.डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन फी भरता येते.

इतर बातम्या:

SBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी

रेल्वे मंत्रालयाचा मेगा प्लॅन, 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार, रेल्वे कौशल्य विकास योजनेला सुरुवात


UPSC Application 2021 Started for Engineering Service Exam and Geo Scientist Post Know how to Apply