UPSC CAPF Assistant Commandant | यूपीएससीच्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेचा निकाल जाहीर

| Updated on: Feb 06, 2021 | 3:18 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगानं केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स 2019 असिस्टंट कमांडट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. UPSC CAPF final result

UPSC CAPF Assistant Commandant | यूपीएससीच्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेचा निकाल जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोग
Follow us on

UPSC CAPF Assistant Commandant AC Final Result 2019 नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स 2019 असिस्टंट कमांडंट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर हा संपूर्ण निकाल उपलब्ध झाला आहे. सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेची मुलाखत दिलेले उमेदवार वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. यामध्ये 264 उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये 132 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी प्रवर्गातून 81 तर अनुसूचित जातीमधून 30 आणि अनुसूचित जमातीमधून 21 उमेदवारांची निवड झाली आहे. (UPSC CAPF Assistant Commandant AC Final Result 2019 Bihar Sachin Kumar secured at top)

बिहारचा सचिन कुमार देशात पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षा 2019 मध्ये बिहारचा सचिन कुमार प्रथम आला आहे. सचिन कुमार याचे वडिल डॉ. राजेश्वर प्रसाद राय विवि मधेपुरामध्ये कार्यरत आहेत. सचिन कुमारनं त्याचे आजोबा रिक्षा चालवत होते. त्यावेळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे सीएपीएफ परीक्षेची तयारी करताना धैर्य वाढल्याचं सचिन कुमारनं सांगितलं.

सचिन कुमारनं सहावीनंतर सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नालंदा सैनिक स्कूलमध्ये त्यानं शिक्षण घेतलं. 12 वीच्या परीक्षेत देखील तो प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला होता. कोरोना काळात घरी राहूनचं परीक्षेची तयारी केली असं सचिन कुमारनं सांगितलं.

केंद्रीय लोकसेवा आयोगानं सीएपीएफ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची पहिली परीक्षा 18 ऑगस्ट 2019 मध्ये घेतली होती. त्यानंतर त्यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची मुलाखत 2 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 मध्ये झाली होती.


संबंधित बातम्या:

Special Story | Government Job 2021 : जगात मंदी; UPPCL, एनटीए, बीईएलमध्ये नोकऱ्यांची सुवर्णसंधी

Central Railway Recruitment 2021: मुंबईत रेल्वेमध्ये 2500+ अ‍ॅप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

UPSC Exam : कोरोनामुळे UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी


(UPSC CAPF Assistant Commandant AC Final Result 2019 Bihar Sachin Kumar secured at top)