Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांना मोठ यश

Daya Nayak : दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे 9 शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दया नायक यांचा एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून पोलीस दलात दबदबा होता.

Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांना मोठ यश
Daya Nayak
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 10:12 AM

एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी मोठी कारवाई केली. वांद्र्याच्या रेक्लेमेशन परिसरात छापेमारीची कारवाई करण्यात आली. तिथून पोलिसांनी 286 किलो गांजा जप्त केला आहे. केसी मार्ग रोड परिसरात हे गोडाऊन आहे. मुंबईत विविध ठिकाणी सप्लाय करण्याच्या हेतूने इथे हा गांजा ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारीची कारवाई करुन गांजा जप्त करण्यात आला. 36 वर्षीय इम्रान अन्सारी नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईच्या विविध ठिकाणी हा गांजा पाठवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर काल सायंकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान छापा मारण्यात आला. गोडाऊनला टाळं लावण्यात आलं होतं. मागच्या अनेक महिन्यांपासून इमरान अन्सारी त्याच्या साथीदारांसह इथे राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

मुंबईत एवढा गांजा आला कुठून?

286 किलो मुंबईत एवढा गांजा आला कुठून? कोणाला विकणार होते? याचा शोध मुंबई पोलिसांच्या गुन्हे 9 शाखेकडून सुरु आहे. ही मोठी कारवाई आहे. यामुळे काही प्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कशाप्रकारे व कोठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे. सध्या या गोडाऊनला टाळे ठोकलं असून अजून कोण-कोण आरोपी आहेत, याचा तपास सुरू झाला आहे.

दया नायक कोण?

काही वर्षांपूर्वी दया नायक हे मुंबई पोलीस दलात मोठ नाव होतं. अंडरवर्ल्डच्या अनेक गुंडांना त्यांनी कंठस्नान घातलं होतं. एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. या दरम्यान त्यांच्यावर काही आरोपही झाले होते.