40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा

| Updated on: Nov 23, 2021 | 10:31 AM

ओम साई प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याने फर्निश ऑईलचा परवाना शासनाकडून घेतला होता. मात्र, त्या ठिकाणी फर्निश ऑईचे फक्त बिल तयार केले जायचे.

40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा
Follow us on

नाशिकः सिन्नर औद्योगिक वसाहतीत छापा टाकून पोलिसांनी तब्बल 40 हजार लिटर बायोडिझेल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. 20 हजार लिटरच्या दोन टाक्या आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी कंपनी मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ही तडाखेबंद कामगिरी केली. याचे कौतुक होत आहे.

अशी केली कारवाई

एका खबऱ्याने सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये बायोडिझेलचा गोरखंदा सुरू असल्याची टीप दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी कारवाईचे नियोजन केले. सिन्नर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. त्यांना या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली दिसल्या. एक टँकर ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीतून बाहेर पडत होता. पोलिसांनी त्या टँकरचा पाठलाग सुरू केला. त्याला गाठले. टँकरची तपासणी केली. तेव्हा त्यात बायोडिझेल आढळले. पोलिसांनी तातडीने हा टँकर जप्त केला. त्यानंतर पुन्हा ज्या गोदामातून टँकर बाहेर पडला तेथील ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीवर कारवाई केली. तिथे त्यांना 26 लाखांच्या बायोडिझेलचा साठा आढळला.

4 जणांवर गुन्हा

नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याच्यासह त्याचा मुलगा सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नूरमोहम्मद खान, अनिल महादू माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ व सहजीवनमापे कलम अंमलबजावणी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

अशी ही बनवाबनवी

खरे तर ओम साई प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याने फर्निश ऑईलचा परवाना शासनाकडून घेतला होता. मात्र, त्या ठिकाणी फर्निश ऑईचे फक्त बिल तयार केले जायचे. या नावाखाली टँकरमधून बायोडिझेलचा पुरवठा सुरू होता. याचीच माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. आता या बायोडिझेलचा पुरवठा कुठे-कुठे केला जात होता, यात अजून कोणी सहभागी आहेत का, यांची साखळी आहे, याचा तपास पोलिसांना करावा लागेल.

इतर बातम्याः

Nashik| शेतकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांना 2 तास घेराव; अखेर कृषिमंत्र्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश

Nashik| भाजपची कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने, मालेगाव दंगलीचा नोंदवला निषेध, रझा अकादमीवर बंदीची मागणी

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार