मेल्यानंतरही नागेश्वरला सोडणार नाही म्हणत 10 वर्षाच्या चिमुकल्याचे टोकाचे पाऊल, कारण काय?

मयत मुलगा बगोदर येथील एका शाळेत शिकत होता. शाळेत त्याला नागेश्वर नामक शिक्षकाने वर्गात सर्वांसमोर दमदाटी केली. यामुळे मुलाच्या मनात अपमानास्पद भावना निर्माण झाली.

मेल्यानंतरही नागेश्वरला सोडणार नाही म्हणत 10 वर्षाच्या चिमुकल्याचे टोकाचे पाऊल, कारण काय?
संपत्तीसाठी पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी
Image Credit source: Google
| Updated on: Oct 29, 2022 | 5:29 PM

गिरीडीह : शिक्षकाने शाळेत सर्वांसमोर ओरडले आणि अपमानित केले म्हणून 10 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येपूर्वी मुलाने सुसाईड नोट लिहिली असून, त्यात शिक्षकाला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

बगोदर येथील शाळेत शिकत होता मुलगा

मयत मुलगा बगोदर येथील एका शाळेत शिकत होता. शाळेत त्याला नागेश्वर नामक शिक्षकाने वर्गात सर्वांसमोर दमदाटी केली. यामुळे मुलाच्या मनात अपमानास्पद भावना निर्माण झाली.

काय लिहिले सुसाईड नोटमध्ये?

मी नक्की मरणार, मेल्यानंतरही नागेश्वरला सोडणार नाही. लव्ह यू पप्पा, लव्ह यू मंमी. तुम्ही मला जन्म दिला, मी नेहमीच तुमच्यासोबत असेन, असे मुलाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

शाळेत घरी येताच केली आत्महत्या

मयत मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेत शिक्षक त्याला काही कारणांनी ओरडले. त्यानंतर शाळेतून घरी येताच त्याने सुसाईड नोट लिहिली आणि आत्महत्या केली, असे मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. प्रथमदर्शनी मुलाने आत्महत्या केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.