
कर्नाटकातील मैंगलोर येथे 19 वर्षीय मुलीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी बीए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती आणि तालापाडी येथील किन्या भागात राहत होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले. असे सांगितले जाते की, ही मुलगी मानसिक तणावात होती आणि तिला नेहमी डोकेदुखीचा त्रास होत होता. तिच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.
मृत मुलीची ओळख 19 वर्षीय श्रेया अशी झाली आहे. तिने मंगळवारी, 24 जून रोजी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीच्या मृतदेहाचा ताबा घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. श्रेयाच्या खोलीतून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली.
वाचा: महाराज जात पाहून स्कॉलरशिप व नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे; किरण मानेची पोस्ट चर्चेत
खोलीतील कपाटावरही लिहिली नोट
पोलिसांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली. श्रेयाच्या खोलीतून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, तिच्या सावळ्या रंगामुळे तिचा अपमान केला जात होता. मे महिन्यात तिने एका कागदावर लिहिले होते की, कोणीही तिच्यावर प्रेम करत नाही आणि तिच्यामुळे तिच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तिची जगण्याची इच्छा संपली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयाने तिच्या खोलीतील कपाटावरही लिहिले आहे की, ‘मला ही पिढी आवडत नाही, म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.’
पहिल्या सत्रात दोन विषयांत नापास
तपासात समोर आले आहे की, श्रेया बीए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती पहिल्या सत्रात दोन विषयांत नापास झाली होती. तिच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, श्रेया शांत स्वभावाची मुलगी होती आणि ती इतरांशी फार कमी बोलत असे. ती मैंगलोरमधील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती आणि बीएचे शिक्षण घेत होती. श्रेयाच्या सुसाइड नोटनुसार, तिच्या सावळ्या रंगामुळे तिचा अपमान होत होता, ज्यामुळे ती खूप दुखावली गेली होती. याच कारणामुळे ती मानसिक तणावात होती.