शिक्षक झाला भक्षक ! नाशिक शहर पुन्हा हादरलं, विद्यार्थिनीसोबत क्रीडा शिक्षकांनं केलं गैरवर्तन

नाशिकमधील एका नामवंत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने शाळेतच अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

शिक्षक झाला भक्षक ! नाशिक शहर पुन्हा हादरलं, विद्यार्थिनीसोबत क्रीडा शिक्षकांनं केलं गैरवर्तन
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Image Credit source: Google
| Updated on: Jan 09, 2023 | 4:51 PM

नाशिक : नाशिकमधील शालेय मुली सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका शिक्षकानेच शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या नामवंत शिक्षण संस्थेतील शिक्षकाच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने विनयभंग केल्यानं खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या विरोधात पोंक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित विद्यार्थीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शिक्षकाचे नाव रवींद्र नाकील असे असून तो फरार आहे. त्याचा शोध अंबड पोलीस करीत आहे.

नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे.

उंटवाडी येथील माध्यमिक शाळेत गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. शाळेतच अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे.

नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे, सहा जानेवारीला हा प्रकार घडला आहे. दुपारी वाजता ही घटना घडली आहे.

शिक्षक रविंद्र नाकील याने पिडीत विद्यार्थिनीसोबत नको तेवढी जवळीक साधत गैरवर्तन केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

पिडीत विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक रविंद्र नाकील याच्याविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.