AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंबल वापरायचा, तुझ्या वाईट सवयी…डॉ. स्तुती सोनवणेने का संपवलं जीवन? Bf फुजैलसाठी लिहिलेली चिठ्ठी काळीज चिरणारी

मुंबईतील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात डॉक्टर स्तुती सोनवणेने BF फुजैल मोहम्मद खान देत असलेल्या वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बंबल वापरायचा, तुझ्या वाईट सवयी...डॉ. स्तुती सोनवणेने का संपवलं जीवन? Bf फुजैलसाठी लिहिलेली चिठ्ठी काळीज चिरणारी
Smriti SonawaneImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 12, 2026 | 1:55 PM
Share

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात ८ मार्च रोजी एका २४ वर्षीय एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) विद्यार्थिनी डॉ. स्तुती सोनवणे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या खोलीतून सहा पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे. या नोटमध्ये स्तुतीने आपल्या प्रियकर फुजैल मोहम्मद खान (फजल/फुजैल खान, वय ३१) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने त्याच्याबरोबरच्या नात्याची सुरुवात एका डेटिंग अॅपद्वारे कशी झाली, ते कसे पुढे गेले आणि शेवटी मानसिक त्रासामुळे तिला आयुष्य संपवावे लागले, याची सविस्तर माहिती लिहिली आहे.

नोटमध्ये तिने भावुक शब्दांत म्हटले आहे की,

“तू मला खूप अपमानित केलंस, तुझ्या कठोर शब्दांनीच मला जीव देण्यास भाग पाडलं.”

“मला तुझ्यासोबत राहायचं होतं, पण तू मला ओरडलास, अपमान केलास. मी समोर असते तर तू मला मारलं असतस किंवा हिंसक झाला असतास.”

“तुझ्या वडिलांनी म्हटलं होतं तरुण मुली चांगल्या नसतात, ते बरोबर होतं असं तू म्हणालास.”

“रिलेशनमध्ये असतानाही तुझ्याकडे बंबल अॅप होतं, तरी मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभिमान नव्हता.”

“तुझ्या वाईट सवयी सिगारेट, दारू सगळं मी सहन केलं. मी मूर्ख होते, पण तुझ्या प्रेमात पडले.”

स्तुतीने आपल्या मित्र-मैत्रिणींचाही उल्लेख केला आहे, जे तिच्या नात्यातील त्रास जाणून “तुला फ्रिजमध्ये पाहायचं नाही” अशा प्रकारे टिप्पणी करत असत. ही सुसाईड नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांनी सुसाईड नोट आणि तिच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे फुजैल मोहम्मद खान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या (abetment to suicide) आरोपाखाली अटक केली आहे. तो विमा एजंट म्हणून काम करतो आणि लोअर परळ येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना मुंबईतील वैद्यकीय वर्तुळात आणि समाजात मोठ्या प्रमाणात खळबळ उडवणारी ठरली आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा