AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Mategaonkar : पहिलं मूल, दुसरं मूल…, लग्नसंस्थेवर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली, सर्वत्र तिच्या विधानाची चर्चा

Ketaki Mategaonkar : भारतीय लग्नसंस्थेतल्या कोणत्या गोष्टी केतकी माटेगावकर हिला खटकतात, अभिनेत्री लग्नाबद्दल स्वतःचं मत स्पष्टच मांडलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केतकी माटेगावकर हिच्या वक्तव्याची चर्चा...

Ketaki Mategaonkar : पहिलं मूल, दुसरं मूल..., लग्नसंस्थेवर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली, सर्वत्र तिच्या विधानाची चर्चा
Ketaki Mategaonkar
| Updated on: Nov 01, 2026 | 8:14 AM
Share

Ketaki Mategaonkar : केतकी माटेगावकर हिने फक्त एक अभिनेत्री म्हणून स्वतःचं नाव मोठं केलं नाही तर, ती एक उत्तम गायिका देखील आहे. ‘टाईमपास’, ‘टाईमपास 2’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘शाळा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत केतकी माटेगावकर हिने चाहत्यांच्या मनात फार कमी वेळात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत केतकी हिने भारतीय लग्न संस्थेवर फार मोठं वक्तव्य केलं आहे.

सांगायचं झालं तर, असं कायम म्हटलं जातं की, लग्न फक्त दोन व्यक्तींचं नसत तर ते दोन कुटुंबाचं असतं… यावर एका मुलाखतीत केतली हिला एक प्रश्न विचारण्यात आला की, ‘लग्न संस्थेवर विश्वास आहे का?’ यावर केतकी हिने तिला खटकणाऱ्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या…’

लग्नावर स्वतःचं मत मांडताना केतकी म्हणाली, ‘लग्न म्हणजे दोन परिवारांचं एकत्र येणं असं आपल्याकडे मानलं जातं. पण असं वाटतं ते दोघांचं जास्त आहे. कारण त्याच्यातले येणारे चॅलेंजेस, त्याच्यातल्या येणाऱ्या चांगल्या – वाईट गोष्टी, महत्त्वाचे निर्णय… मी प्रत्येक गोष्टीबद्दल सांगत आहे, त्यामध्ये फॅनॅन्स आले, घर चालवणं झालं.. मुलांना वाढवणं… हे सर्व ते दोघे ठरवत असतात.

पुढे केतकी म्हणाली, ‘मला असं वाटतं की, या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एक सोसायटी किंवा नातेवाईकांचे काही विशिष्ट प्रश्न असतात, काय मग आता पहिलं मूल कधी, दुसरं मूल कधी… मला ते प्रश्न थोडेसे चुकीचे वाटतात. कारण प्रेमाने आई – वडिलांनी विचारणं किंवा त्यामागचा हेतू काय आहे, हे मी नक्कीच समजू शकते…आई – वडिलांची ती काळजी मी समजू शकते.’ असं केतकी स्पष्टच म्हणाली.

आंथरून पाहून पाय पसरावे – केतकी माटेगावर

केतकी कायम महत्त्वाच्या विषयांवर स्वतःचं मत व्यक्त करत असते, एकदा केतकी असं देखील म्हणालेली की,  ‘वक्तव्य थोडं बोल्ड वाटेल पण मला आंथरून पाहून पाय पसरावे…’ हे वाक्य आवडतन नाही, त्यापेक्षा, ‘आंथरुन मोठं केलं तर… आंथरुन मोठं करण्याचा प्रयत्न केला तर…’, असं केतकी हिने एका मुलाखतीत सांगितलं. ‘पैशांकडे केवळ गरज म्हणून न पाहता, तो आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. हे पाहिल पाहिजेच. पैसा अर्थातच सर्वकाही नाही. पण तो सर्वकाही आहे सुद्धा…’, असं देखील केतकी म्हणालेली.

Follow Us
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!