तुम्हीही गूगलवर कुरियर सर्विस सर्च करत असाल तर सावधान !, तुम्हालाही ही चूक पडू शकते महागात

| Updated on: Feb 28, 2023 | 1:52 PM

गूगलवर कुरिअर कंपनीची फेक वेबसाईट बनवून नागरिकांना गंडा घालणाऱ्या तिघांना नागपाडा पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. आरोपींनी आतापर्यंत किती नागरिकांना ऑनलाईन फसवले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

तुम्हीही गूगलवर कुरियर सर्विस सर्च करत असाल तर सावधान !, तुम्हालाही ही चूक पडू शकते महागात
सायबर क्राईम
Follow us on

मुंबई : गूगलवर कुरियर कंपनीची फेक वेबसाईट बनवून लोकांना गंडा घालणाऱ्या तीन आरोपींच्या नागपाडा पोलिसांनी झारखंडमधून मुसक्या आवळल्या आहेत. झारखंडमधील जामतारा येथून सापळा रचून आरोपींना अटक केली. सत्तार अन्सारी, रियाज अन्सारी आणि नजीर अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. एका तरुणाला 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नागपाडा पोलिसात तक्रार दाखल झाली होती. या घटनेचा तपास करत असताना फेक वेबसाईटचा पर्दाफाश झाला.

गूगलवर फेक वेबसाईट बनवून नागरिकांना लुटायचे

नागरिक जेव्हा गूगलवर कुरिअर सर्विसबाबत सर्च करायचे, तेव्हा त्यांना वेबसाईट आरोपींचे मोबाईल नंबर दिसायचे. या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना दुसऱ्या नंबरवरुन कॉल येईल, त्यावर लिंक पाठवली जाईल असे सांगितले जायचे. तसेच कुरिअर लवकर पाठवायचे असेल तर लिंक वर क्लिक करुन बँक डिटेल भरण्यास सांगितले जायचे. नागरिकांनी बँक डिटेल भरताच आरोपी त्यांच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे.

एका तरुणाला 95 हजाराचा गंडा घातल्यानंतर घटना उघडकीस

नागपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाचे एक पार्सल कुरिअरने येणार होते. एका एजंटने त्याला फोन केला आणि लवकर पार्सल हवे असल्यास पैसे भरण्यास सांगितले. यानंतर एजंटने पाठवलेल्या लिंकवर पैसे पाठवत असताना तरुणाच्या खात्यातून 95 हजार रुपये काढून घेण्यात आले. तरुणाच्या ही बाब लक्षात येताच त्याने तात्काळ नागपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

हे सुद्धा वाचा

आरोपींना झारखंडमधून अटक

नागपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी तरुणाला ज्या नंबरवरुन फोन आला होता, त्या नंबरचा तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध लागला. सर्व आरोपी झारखंडमधील जामतारा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नागपाडा पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकल्या.