Hyderabad Crime : शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले, नुकसान भरपाईसाठी सरकारी अधिकाऱ्याने केली ‘ही’ युक्ती; मग…

| Updated on: Jan 19, 2023 | 6:20 PM

मुख्य आरोपी हा सरकारी खात्यामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस चक्रावून गेले आहेत. विम्याच्या माध्यमातून सात कोटी 40 लाख रुपये हडप करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने हा रक्तरंजित कट रचला होता.

Hyderabad Crime : शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले, नुकसान भरपाईसाठी सरकारी अधिकाऱ्याने केली ही युक्ती; मग...
तलवार घेऊन फोटो ठेवणाऱ्या तरुणाला अटक
Image Credit source: Tv9
Follow us on

हैदराबाद : शेअर बाजारात नुकसान झालेल्या पैशांची उभारणी करण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादाक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. एका अनोळखी तरुणाची हत्या करत स्वतःची हत्या झाल्याचे भासवले. मात्र बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना ही भयंकर घटना उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने हैदराबादसह संपूर्ण राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी हा सरकारी खात्यामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस चक्रावून गेले आहेत. विम्याच्या माध्यमातून सात कोटी 40 लाख रुपये हडप करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने हा रक्तरंजित कट रचला होता.

आरोपी हैद्राबाद सचिवालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत

गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा हैद्राबाद येथील तेलंगणा राज्य सचिवालयात सहाय्यक अनुभाग अधिकारी म्हणून कार्यरत होता. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी या अधिकार्‍यासह त्याची पत्नी आणि अन्य दोन नातेवाईकांना अटक केली आहे.

केवळ पैशांच्या लोभापायी एका निष्पाप तरुणाला जीवे मारल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून, आरोपींच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य आरोपीचे शेअर बाजारात 86 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

हे सुद्धा वाचा

हा तोटा भरून काढण्यासाठी त्याने पत्नी आणि जवळच्या नात्यातील दोघांना हाताशी धरून विम्याचे पैसे लाटण्याचा कट रचला होता. यासाठी कुणाच्या तरी हत्या करून मृत्यू झाल्याचे दाखवून नैसर्गिक मृत्यू प्रकरणी विमा विभागाकडून 7 कोटी 40 लाख रुपयांची भरपाई हडप करण्याचा प्लान रचला होता.

विमा भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी घेतल्या 25 विमा पॉलिसी

आरोपीने पैसे मिळवण्यासाठी शक्कल लढविली होती. त्याचा अजब प्लान ऐकून विमा विभागाचे अधिकारी तसेच तपास करणारे पोलीस प्रचंड हादरले आहेत. आरोपीने 7 कोटी 40 लाख रुपयांची विमा भरपाई मिळवण्यासाठी एक दोन नव्हे तर 25 विमा पॉलिसी घेतल्या होत्या.

यासाठी आरोपी सरकारी अधिकार्‍याच्या चेहर्‍याशी मिळताजुळता असलेल्या तरुणाची ओळख पटली. त्यानंतर अधिकार्‍याच्या हत्येचा बनाव रचला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.