लग्न करून कोट्यवधी व्हा! ‘त्या’ व्हायरल व्हिडिओपासून सावधान !

| Updated on: Nov 10, 2022 | 2:57 PM

अनेक तरुणांच्या मोबाइलमध्ये तो व्हिडिओ असून ज्या ठिकाणी हा व्हिडिओ शेयर केला आहे, त्या लिंकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन अनेक तरुण आपला मोबाइल नंबर शेयर करत आहे.

लग्न करून कोट्यवधी व्हा! त्या व्हायरल व्हिडिओपासून सावधान !
अमानुष छळ करणाऱ्या पती आणि सासरच्यांविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात धाव
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : अलिकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने सहजरित्या फसवणूक केल्याचे अनेक फंडे समोर येत आहेत. मात्र, एकदमच साध्या पद्धतीने व्हिडिओ करून भावनिक साद घालत तरुणांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या सातपुर परिसरात अशीच एका तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून सायबर पोलिसांत त्याने ही माहिती दिली आहे. याबाबत अद्याप तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाहीये. दरम्यान, व्हिडिओ बघून अनेकांची फसवणूक झाली असेल अशी शंका व्यक्त केल्याने सायबर पोलिसांची चिंता वाढणार आहे. खरंतर अलिकडच्या काळात अनेक तरुण अविवाहित आहे. लग्न होत नसल्याने नैराश्य येत असल्याचे प्रकारही समोर येत आहे. अशातच एक विधवा महिला असून तिला कुठलेही अपत्य नाही, बंगला आहे, गाड्या आहे, दागिने आणि कोट्यवधी रुपयांचा पैसा आहे. फक्त चांगला जोडीदार हवा आहे अशी ऑफर आली तर कुणीही तरुण लागलीच तयार होऊ शकतो. आणि याचाच फायदा घेत दोन महिलांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

अनेक तरुणांच्या मोबाइलमध्ये तो व्हिडिओ असून ज्या ठिकाणी हा व्हिडिओ शेयर केला आहे, त्या लिंकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन अनेक तरुण आपला मोबाइल नंबर शेयर करत आहे.

कोट्यवधी होण्याची संधी आणि सुंदर महिला आपली बायको होणार या आमिषाला बळी पडून अनेक जण तिथे नंबर शेयर करत असून त्यांना समोर प्रतिसाद देखील मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

असाच एक कॉल नाशिकच्या सातपुर येथील तरुणाला आला होता, त्यात त्याची फसवणूक झाल्याची बाब त्याच्या निदर्शनास आली असून त्याला पश्चाताप होत आहे.

तरुणांच्या सुरक्षेसाठी नाव जाहीर करता येत नसले तरी, ऑफर बघून अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याची शक्यता असल्याने पीडित तरुणाने ही माहिती पोलिसांना कळवली आहे.

फसवणूक करण्यासाठी महिलांनी नवा फंडा शोधला आहे. ही सर्व संपत्ती तुझीच होणार असून फक्त सुरुवातीला प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी खर्च करावा लागेल त्यानंतर मग सगळी प्रॉपर्टी तुझीच आहे असं सांगितले जाते.

सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस सतत फोनवर बोलणं केलं जातं, त्यानंतर पैसे मागितले जाते, आणि त्यानंतर पैसे न दिल्यास धमक्या दिल्या जात असल्याचा हा प्रकार असल्याची माहिती पीडित तरुणाने पोलिसांना कथन केली आहे.

एकूणच या फसवणुकीच्या प्रकरणात महिलांनी लावलेली शक्कल चर्चेचा विषय ठरत असून अशा आमिषाला बळी पडू नका असं आवाहन देखील केले आहे.