60 रुपये मागितले म्हणून क्रिकेटच्या बॅटने मारहाण, पीटी शिक्षकाला अटक

| Updated on: Feb 04, 2023 | 11:29 PM

ड्युटीवर असलेल्या एमसीडी पार्किंगमध्ये काम करणाऱ्या विकासने विक्रमकडे कार पार्किंगचे 60 रुपये मागितले. विक्रमने पैसे देण्यास नकार देत विकासशी वाद घातला. दरम्यान, विकासचा साथीदार मनोजही आला. दोघांनी विक्रमला 60 रुपये देण्याची विनंती केली.

60 रुपये मागितले म्हणून क्रिकेटच्या बॅटने मारहाण, पीटी शिक्षकाला अटक
पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण
Follow us on

नवी दिल्ली : पार्किंगचे पैसे मागितले म्हणून एका तरुणाला क्रिकेटच्या बॅटने जबर मारहाण केल्याची घटना दिल्लीतील हायप्रोफाईल परिसरात घडली आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी तरुणाला तीन मुले आहेत. मारहाण करणारा आरोपी हा दिल्लीतील एका नामांकित शाळेत पीटी टीचर आहे. पोलिसांनी आरोपी पीटी टीचरला अटक केली आहे. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. विक्रमजीत सिंग असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रमजीत सिंगला अटक केली आहे.

1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पीटी शिक्षक विक्रमजीत सिंग याने आपली कार साकेत येथील प्रिया कॉम्प्लेक्सच्या एमसीडी पार्किंगमध्ये लावली होती. यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेला विक्रम रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास परत आला आणि गाडी घेऊन निघाला.

आरोपीकडे पार्किंगचे 60 रुपये मागितले

यावेळी ड्युटीवर असलेल्या एमसीडी पार्किंगमध्ये काम करणाऱ्या विकासने विक्रमकडे कार पार्किंगचे 60 रुपये मागितले. विक्रमने पैसे देण्यास नकार देत विकासशी वाद घातला. दरम्यान, विकासचा साथीदार मनोजही आला. दोघांनी विक्रमला 60 रुपये देण्याची विनंती केली.

हे सुद्धा वाचा

मात्र दारूच्या नशेत असलेल्या विक्रमने पैसे देण्यास नकार दिला. तसेच गाडीतून खाली उतरून मनोजला चापट मारण्यास सुरुवात केली. यावर विकास आणि मनोज यांनी विक्रमला पैसे न देता निघून जाण्यास सांगितले. मात्र विक्रमने कारमधून क्रिकेटची बॅट काढून दोघांवर हल्ला केला.

विक्रमने दोघांनाही बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवून दोघेही प्रिया कॉम्प्लेक्सच्या दिशेने धावले, गर्दीत आपण वाचू असे वाटले. त्यानंतर मनोज पीव्हीआर रेस्टॉरंटमध्ये दाखल झाला. मात्र, विकासने आरोपी विक्रमला पकडले.

त्याने विकासला जमिनीवर आपटले आणि बॅटने जबर मारहाण केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती, मात्र त्याला वाचवण्याची तसदी कोणी घेतली नाही. डोक्यावर अनेक वार झाल्याने विकास गंभीर जखमी झाला.

एम्समध्ये विकासवर उपचार सुरू

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनस्थळी पोहचत जखमी विकासला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. विकास झारखंडचा रहिवासी आहे. तो अनेक वर्षांपासून पार्किंगमध्ये काम करत होता.

या संपूर्ण घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रमजीत सिंगला अटक केली. आरोपी हा साकेत येथील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे.